रस्त्यावर गर्दी करणार्‍या २३३ जणावर पोलिसांकडून गुन्हे दाखल

इंदापूर : पुणे जिल्हाधीकारी यांच्या आदेशाचा भंग करून तोंडाला मास्क न लावता कोरोना विषाणु हा संसर्गजण्य रोग आहे. तो इतरत्र कोठेही, केव्हांही पसरू शकतो याची जाणीव असताना देखील संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर बीनकामाची गर्दी करणार्‍यां २३३ जणांवर इंदापूर पोलीसांनी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे.

 एकूण ३७ जणांना दंडासह कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

इंदापूर : पुणे जिल्हाधीकारी यांच्या आदेशाचा भंग करून तोंडाला मास्क न लावता कोरोना विषाणु हा संसर्गजण्य रोग आहे. तो इतरत्र कोठेही, केव्हांही पसरू शकतो याची जाणीव असताना देखील संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर बीनकामाची गर्दी करणार्‍यां २३३ जणांवर इंदापूर पोलीसांनी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे. तर त्यापैकी ३७ जणांना ताब्यात घेवुन न्यायालयात हजर केले असता त्यांना रोख रक्कम दंडासह कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे.
राज्यात सर्वत्र लाॅकडाऊन व संचारबंदी आदेश लागु असल्याने नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून वारंवार सूचना देवुन सुद्धा नागरिकांनी लाॅकडाउन व संचारबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत एकुण २३३ जणांवर कोरोना रोगप्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असुन त्यापैकी ३७ जणांना इंदापूर न्यायालयाने  रोख रक्कम दंडासह कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली आहे. ही कारवाई दि.२३ मार्च ते २१ एप्रिल २०२० दरम्यान करण्यात आली आहे. तरीही नागरिक रस्त्यावर बीनकामाची गर्दी करताना दिसुन येत असल्याने कायदा व सुव्यवस्था  राखण्याच्या दृष्टीने पोलीसांना खबरदारीचा उपाय म्हणून गुन्हे दाखल करणे भाग पडत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
-२३३ जणावर मोटार सायकलसह गुन्हे दाखल
इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बावडा, निमगाव केतकी व इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असुन एकूण २३३ जणावर मोटार सायकलसह गुन्हे दाखल केले आहेत. तर त्यापैकी ३७ जणांना वेळोवेळी पोलीसांनी ताब्यात घेवुन इंदापूर येथील कोर्टात हजर केले असता त्यांना रोख रक्कम दंडासह कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली. सदरची कारवाई ही पूणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांचे आदेशाने व इंदापूर पोलीस निरिक्षक नारायण सारंगकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश लोकरे, सुशील लोंढे, पो. हवा. शंकर वाघमारे, ठाणे अंमलदार दिपक पालके, गुप्त वार्ता विभागाचे विनोद पवार, अमोल खैरे, सुनिल नगरे, काकासाहेब पाटोळे,निलेश फडणीस, आमोल गारूडी, प्रविण शिंगाडे यांनी केली आहे.