प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    पुणे : शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

    पोलीस शिपाई राजेश दगडू महाजन (वय 50) असे गळफास घेतलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, महाजन हे लष्करात होते. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस जॉईन केले. ते पुणे शहर पोलीस दलात दाखल होते. दरम्यान त्यांनी आज राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहेत.

    काही वेळापूर्वी हा प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी हडपसर पोलिसांनी धाव घेतली आहे. कौटुंबिक कारणावरून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ते हडपसर येथील हारपळे वस्तीत राहत होते.