मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा

हॉटेल मालकांसह १३ जणांवर कारवाई
मंचर : आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी येथील शिवानंद हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकुन ३ लाख ३० हजार ८२० रुपयांचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी हॉटेलमालकांसह १३ जणांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि मंचर पोलिस यांनी केली.

-३ लाख ३० हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेटड्ढोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की,नाशिक-पुणे हायवे लगत शेवाळवाडी गावाच्या हद्दीत शिवानंद हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर खोलीत तीन पत्ती नावाचा जुगार खेळला जात असुन त्याचे शेजारीच कल्याण मटका घेतला जात आहे. सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक रवींद्र मांजरे यांनी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना देऊन पंचांसोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व मंचर पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे शिवानंद हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन छापा घातला. हनुमंत दत्तु पवळे (वय ४२) राहणार राक्षेवाडी राजगुरुनगर, सत्यवान धोंडिबा डफळ (वय ४८) राहणार धामारी (ता.शिरुर) संजय बबन कंधारे (वय ४७) राहणार पेठ पारगांव, खंडु पोपट कुरकुटे (वय ३८) राहणार थोरांदळे,सचिन दत्तात्रय मानकर (वय ३२) राहणार पेठ पारगांव,धनेश ज्ञानेश्वर साकोरे (वय ४७) राहणार पाबळ, बाळकृष्ण धाकु आहिरे (वय ४७) राहणार पिंपळगांव फाटा मिळुन आले. दत्तात्रय बाळु पडघमकर (वय ४७) राहणार पारगांव िशंगवे, अविनाश भरत राजगुरु (वय ३३) राहणार मंचर,निलेश अरुण कंधारी (वय ४०) राहणार पेठ पारगांव,संदिप शिवाजी कडुसकर वय ३७ राहणार पेठ पारगांव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका रुममध्ये तीन पत्ती नावाचा पत्त््यांचा जुगार व शेजारी दुसऱ्या रुमध्ये मटका घेत असल्याचे जुगार व मटक्याचे साहित्यासह पकडले. तीन पत्ती जुगार हॉटेल शिवानंद व जुगार क्लबचा मालक पांडुरंग सखाराम मोरडे राहणार शामानंद बारच्या मागे मंचर आणि मटका चालक अक्षय बाळासाहेब बोऱ्याडे रा. मुळेवाडी रोड मंचर यांच्यासह जुगार व मटका खेळणाऱ्या व खेळावणाऱ्या १३ आरोपींवर मंचर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ), आरोपींनी कोरोना काळात सुरक्षित अंतर न ठेवता व तोंडाला मास्क न लावता मिळुन आले म्हणुन भारतीय दंड विधान कायदा कलम १८८, २६९, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ सह साथीचे रोग कायदा कलम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या कारवाईत जुगार व मटक्याची साधने,रोख रक्कम, मोबाईल व मोटार सायकली असा एकुण ३ लाख ३० हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत सुनील जावळे, शरद बांबळे, नितीन भोर, अक्षय नवले,दगडु विरकर, राजेंद्र हिले,विठ्ठल वाघ यांनी केली.