भाजीपाला घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर पोलिसांची  धाड; टेम्पोतून केले १६०० किलो गोमास जप्त

नारायणगाव : भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोवर आळेफाटा पोलीस नाकाबंदी करीत असताना पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना संशय आल्याने तपासणी करताना टेम्पोमध्ये १ हजार ६०० किलो गोवंशाचे कत्तलीचे मांस आज दि २० पहाटेच्या सुमारास जप्त केले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिली . दरम्यान आळेफाटा पोलिसांची या जुन महिन्यातील तिसरी कारवाई आहे .

      टेम्पो चालक जहीर इस्माईल कुरेशी, रा.साकी विहार रोड,मुंबई याच्या विरुद्ध प्राण्‍यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० नुसार गुन्हा दाखल केला आहे . याबाबत मुजावर दिलेल्या माहितीनुसार आज दि २० रोजी पहाटे पुणे जिल्हा हद्द आळेखिंड येथे नाकाबंदी करताना नाशिक पुणे रोडवर संगमनेर येथून मुंबईकडे जात असलेला  भाजीपाल्याचा आयशर टेम्पो ( एम एच ०४  जे के ५०३५ )या टेम्पोतून पाठीमागच्या बाजूला खाली पाणी पडत असल्याने  पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना संशय आल्याने टेम्पो चालक जहीर कुरेशी कडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आळेखिंड चेकपोस्ट येथील लाईटचे उजेडात आयशर टेम्पो मधील भाजीपाला पाठीमागून काढून तपासणी केली असता आतमध्ये गोवंशाचे कत्तलीचे मांस असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार टेम्पो मध्ये असलेले गोवंश कत्तलीचे मांस पाहणी करून वजन केले असता १ हजार ६०० किलो वजनाचे मिळून आले आहे. त्याप्रमाणे मिळून आले ३ लाख २० हजारचे गोवंश मांस व ८ लाख किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ११ लाख २०,हजारांचा चा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे . हि कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर , पोलीस उप निरीक्षक सतीश डौले ,पोलीस हवालदार  विकास कांबळे ,शंकर भवारी ,चालक राहणे यांनी केली .
आळेफाटा पोलिसांची या जून महिन्यातील तिसरी मोठी कारवाई आहे . पहिली कारवाई १ जूनला रात्रगस्त करीत असताना ५६० किलो बेकायदेशीररित्या कत्तल केलेले जनावरांचे मांस,७ जनावरे ,१४ लहान मोठी गायी वासराची कातडी जप्त केली होती त्यानंतर दुपारी कारवाई १७ जूनला छापा टाकून आळे गावात ३ गोवंश जनावरे  व  ६४० गोमांस व एक पिकअप  असे ८ लाख ३० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे .