पाबळला मटका अड्ड्यावर पोलिसांना छापा

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरूर) येथील एस टी स्थानक परिसरात अवैध्य रित्या सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत तिघा जणांना ताब्यात घेऊन अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरूर) येथील एस टी स्थानक परिसरात अवैध्य रित्या सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत तिघा जणांना ताब्यात घेऊन अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. पाबळ (ता. शिरूर) येथील एस टी स्थानक परिसरात युवराज सुदाम बगाटे हा त्याचे हस्तकांमार्फत मटका चालवीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली, त्यांनतर त्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर, पोलीस शिपाई नीरज पिसाळ, भास्कर बुधवंत यांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यांना तेथे पत्र्याच्या आडोशाला काही नागरिक कागदावर काही आकडे लिहून मटका चालवीत असल्याचे आढळून आले.

यावेळी पोलीस आल्याची चाहुन लागतच तेथील नागरिक पळून जाऊ लागले असताना पोलिसांनी काही नागरिकांना तेथेच पकडले. यावेळी पोलिसांनी तेथील रोख रक्कम, मोबाईल असा सुमारे अकरा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून युवराज सुदाम बगाटे, नितीन दत्तात्रय भूमकर, योगेश रावसाहेब कोल्हे, महादेव रंगनाथ वाशिबे सर्व रा. पाबळ (ता. शिरूर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर हे करत आहे.