आळेफाटा पोलिसांची दबंग कामगिरी ; पावणे दोन लाखाचा दारूसाठा जप्त

नारायणगाव : आळेफाटा पोलिसांनी पिंपळवंडी गावच्या स्टॅन्ड परिसरामध्ये दोन ठिकाणी छापा टाकून १ लाख ६९ हजारांचा अवैध दारू साठा व जुगाराचे साहित्य जप्त करून ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी दिली .

नारायणगाव : आळेफाटा पोलिसांनी पिंपळवंडी गावच्या स्टॅन्ड परिसरामध्ये दोन ठिकाणी छापा टाकून १ लाख ६९ हजारांचा अवैध दारू साठा व जुगाराचे साहित्य जप्त करून ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांनी दिली .

गणेश लेंडे रा पिंपळवंडी व अन्य दोन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल कोरडे यांनी दिली आहे . याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल दि १३ रात्री ११ वा.चे सुमारास आळेफाटा पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळवंडी गावचे स्टॅन्ड परिसरामध्ये दारूचा अवैध साथ असल्याची माहिती पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावरयाना खबऱ्याने दिली असता मुजावर यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील ,उपविभागीय पोलिस अधिकारी जुन्नर मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुजावर, सहाय्यक फौजदार सतीश घाडगे,पोलीस नाईक रफिक तडवी, बर्डे, नरेंद्र गोरणे, गोविंद केंद्रे, केशव कोरडे, हरिशचंद्र करे, प्रदीप गर्जे, मोहन आनंदगावकर, निखिल मुरूमकर, अरविंद वैद्य,सचिन डामसे, किशोर कुलकर्णी, म.पो.शि. ज्योती दहिफळेया पथकाने दोन ठिकाणी अवैध दारू साठा छापा कारवाई केली असता . या कारवाई मध्ये एका ठिकाणाहून ९२ हजारांचा तर दुसऱ्या ठिकाणी ५२,हजारांचा असा एकूण १ लाख ४४,हजारांचा चा अवैध दारू साठा सापडला त्यामध्ये ऑफिसर चॉईस, रॉयल स्टॅग, मॅकडॉल नंबर १, इम्पेरियल ब्ल्यू, जी. एम., डॉक्टर ब्रांडी, डी. एस. पी. ब्लॅक, रॉयल चॅलेंज असे देशी-विदेशी दारूचे एकूण ४२ बॉक्स तसेच २५,हजारांचे जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या पुढील तपास आळेफाटा पोलीस हे करीत आहेत .