पुणे शहर पोलीस दलातील २१४ जागांसाठी पोलीस शिपाई परिक्षा ; परीक्षेसाठी तब्बल पावणे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या देखरेखीखाली परिक्षा पार पडणार असून, त्यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी २७२१ पोलीसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.दरम्यान, परिक्षेला साधारण पंचवीस हजार उमेदवार उपस्थित राहतील असा अंदाज आहे. दरम्यान, परिक्षेचे पुर्ण चित्रीकरण होणार आहे. त्यासोबतच प्रत्येक उमेदवाराची त्याठिकाणी फोटो काढून घेतले जाणार आहेत.

  पुणे : शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा आज (दि. ५) होत आहे. शहरातील विविध केंद्रावर ही परीक्षा होत असून, त्यानिमित्त पुणे पोलिसांनी पावणे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.शहर पोलीस दलातील २१४ जागांसाठी पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा मंगळवारी दि. ५ रोजी होत आहे. त्यासाठी ३९ हजार उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यानुसार शहरातील ७९ केंद्रावर परीक्षा होणार आहे. त्रयस्थ संस्थेला त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष परीक्षा भरती प्रक्रिया रखडली होती. २०१९ मधील ही भरती आहे. सकाळी आकरा ते दुपारी साडे बारापर्यंत ही परीक्षा असणार आहे. साडे दहापर्यंत परीक्षार्थी उमेदवारांनी केंद्रावर हजर रहावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या देखरेखीखाली परिक्षा पार पडणार असून, त्यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी २७२१ पोलीसांचा बंदोबस्त तैनात केला आहे.दरम्यान, परिक्षेला साधारण पंचवीस हजार उमेदवार उपस्थित राहतील असा अंदाज आहे. दरम्यान, परिक्षेचे पुर्ण चित्रीकरण होणार आहे. त्यासोबतच प्रत्येक उमेदवाराची त्याठिकाणी फोटो काढून घेतले जाणार आहेत. तसेच, उमेदवारांना हाफ शर्ट घालून येण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. तर, चप्पल आणि मोबाईल व बॅग बाहेर ठेवून परिक्षे हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. उमेदवारांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने पुर्ण नियोजन करण्यात आलेले आहे.

  असा आहे बंदोबस्त…
  शहरातील ७९ केंद्र
  पोलीस निरीक्षक -७६
  सहाय्यक निरीक्षक-८७
  उपनिरीक्षक- ८०
  पोलीस अंमलदार-२४७८

  दीड तास परिक्षेची वेळ आहे. परिक्षार्थी मुलांना त्रास होणार नाही अशी व्यवस्था केली आहे. सर्व परिक्षेचे चित्रीकरण होणार आहे. उमेदवारांनी वेळेवर परिक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. मुले रात्रीच शहरात येतील यामुळे स्वारगेट, स्टेशन तसेच शिवाजीनगर यासह इतर ठिकाणी पोलीसांची गाडी फिरणार असून, या मुलांना काही अडचण असल्यास मदत करणार आहे.

  -डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस सहआयुक्त