action on man not wearing mask

शहरातील करोना बाधितांची संख्या आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. आदेशांचे भंग करुन मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे.

    पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. विकेंड लॉकडाऊनमध्ये गेल्या दोन दिवसांत (शनिवारी आणि रविवारी) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तातंर्गत विनामास्कच्या आदेशाचा भंग करणाऱ्या ६२७ जणांवर पोलिसांनी कारवाई केली.

    शहरातील करोना बाधितांची संख्या आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. आदेशांचे भंग करुन मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे.

    राज्य शासनाने १ मे पर्यंत शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या घोषणेतील नुकताच शेवटचा विकेंड लॉकडाऊन झाला. प्रशासनाच्या आवाहनाला, आदेशाला नागरिक थेट पायदळी तुडवत आहेत. कोरोना साथीला एक वर्षाहून अधिक काळ झाला. मात्र नागरिक अजूनही त्याबाबत खबरदारी घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिसही अशा नागरिकांवर कठोर कारवाई करीत आहेत.

    शनिवारी आणि रविवारी पोलिसांनी केलेली कारवाई पुढील प्रमाणे –

    एमआयडीसी भोसरी (५४), भोसरी (१७), पिंपरी (७४), चिंचवड (५८), निगडी (४०), आळंदी (३०), चाकण (३७), दिघी (१६), सांगवी (२९), वाकड (२५), हिंजवडी (१२६), देहूरोड (०२), तळेगाव दाभाडे (२६), तळेगाव एमआयडीसी (०३) चिखली (१५), रावेत चौकी (१८), शिरगाव चौकी (३९), म्हाळुंगे चौकी (००).