पोलिसांनी पकडलेल्या चोराकडून सात गुन्हे उघड

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका युवकाला दुचाकी व हत्यारासह जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असताना यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिसरातील चोरीचा डाव फसला होता तर पोलिसांनी पकडलेल्या सदर चोराकडून परिसरातील सात चोरीचे गुन्हे उघड झाले असून त्याचेकडून चोरीचा मुद्देमाल देखील जप्त केला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
 शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई रविकिरण जाधव व होमगार्ड विवेकानंद डफळ हे तेरा ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तळेगाव ढमढेरे ते शिक्रापूर रस्त्याने रात्रगस्त घालत असताना त्यांना गिताई मंगल कार्यालय समोर पोलिसांना पाहून एक युवक झाडाच्या आडोशाला लपून बसत असल्याचे रविकिरण जाधव यांच्या निदर्शनास आले. यावेळी जाधव व डफळ यांनी मोठ्या शिताफीने त्या युवकाला पकडले त्यामुळे पोलिसांना त्याचेवर संशय आल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याचेकडे पत्रा कापण्यासाठी वापरण्यात येणारी मोठी कात्री आणि एक दुचाकी मिळून आली. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याचे नाव विचारले त्याचे नाव गणेश शिंदे असल्याचे सांगितले याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई रविकिरण मोहन जाधव रा. शिक्रापूर (ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी गणेश प्रकाश शिंदे (वय ३०) वर्षे रा. वैदवस्ती तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर)यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याचे जवळील कात्री व दुचाकी जप्त केली करत त्याला अटक केली त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने याच्या सोन साथीदारांच्या मदतीने तळेगाव ढमढेरे, सणसवाडी परिसरातील सहा विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरी केल्या असल्याचे तसेच करंदी रोड लगतच्या एका कंपनीतून चोरी केले असल्याचे कबूल केले आङे. यावेळी पोलिसांनी त्याच्या घरातून चोरीचा मुद्देमाल देखील जप्त केला असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.