‘ओल्या’ अंडवेअरवरून पोलिसांनी असा केला केला खुनाचा उलघडा

मयत संतोष व त्याची पत्नी हे दोघेजण आरोपी कैलास याच्या आई-वडिलांसोबत सतत भांडण करत होते. त्या कारणावरून संतोषचा खून केला असल्याची कबुली कैलासने दिली.

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हयाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात नुकताच भरा दिवसा झाल्या खुनाचा उलघडा पोलिसांनी मोठया शिताफीने केला आहे. हिंजवडी येथील साखरे वस्तीमध्ये संतोष विश्वनाथ माने (वय ३८, रा. साखरेवस्ती, हिंजवडी , या व्यक्तीचा धारदार शास्त्राने वारा करत खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तपास सुरु केला. तपास दरम्यान शेजारी राहणाऱ्या लोकांकडे चौकशी केली, परंतु त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

    दरम्यान, पोलिसांनी शेजारील घरात पाहणी केली. त्यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक बंडू मारणे यांच्या नजरेमध्ये शेजारच्या घरात ओली चड्डी (अंडवेअर) दिसली. घरातील सर्व कपडे सुकलेले आहेत. पंरतु फक्त एक चड्डी ओली का, असा प्रश्न मारणे यांनी केला. मी अंघोळ केली आहे, असे कैलास डोंगरे याने सांगितले. एवढया रात्री त्याने आंघोळ का केली, असा प्रश्न मारणे यांच्या मनात उपस्थित झाला. मी चड्डीत ओकल्यामुळे आंघोळ केली, असे कैलासने सांगितले. त्यामुळे संशय बळावला. चड्डीत कसे ओकू शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला.

    त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता कैलासने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. मयत संतोष व त्याची पत्नी हे दोघेजण आरोपी कैलास याच्या आई-वडिलांसोबत सतत भांडण करत होते. त्या कारणावरून संतोषचा खून केला असल्याची कबुली कैलासने दिली. त्यानंतर कैलास अंकुश डोंगरे (वय २३) याला पोलिसांनी अटक केली.