बारामती तालुक्यात डाळिंब, द्राक्षउत्पादक संकटात ; बागांमध्ये पाणी साठल्याने नुकसान

शिर्सुफळ : बारामती तालुक्यात मागील पंधरा दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने डाळिंब व द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. बागांमध्ये पाणीच पाणी साठले आहे.बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, कटपळ, पारवडी, मळद,निंबोडी, रावणगाव,येथील शेतकऱ्यांना शेतीचा आधार म्हणून पाहिला जाणाऱ्या डाळिंबाला कधी नव्हे, तो यंदा पावसाच्या अतिरेकाने चांगलाच फटका बसला आहे.

शिर्सुफळ : बारामती तालुक्यात मागील पंधरा दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने डाळिंब व द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. बागांमध्ये पाणीच पाणी साठले आहे.बारामती तालुक्यातील शिर्सुफळ, कटपळ, पारवडी, मळद,निंबोडी, रावणगाव,येथील शेतकऱ्यांना शेतीचा आधार म्हणून पाहिला जाणाऱ्या डाळिंबाला कधी नव्हे, तो यंदा पावसाच्या अतिरेकाने चांगलाच फटका बसला आहे.अनेक ठिकाणी बागांमध्ये पाणी साठले आहे. झाडे पडली आहेत. कुठे मूळकूज व फुलगळी झाली आहे. सततच्या पावसाने प्राथमिक अंदाजानुसार बारामती तालुक्यातील सुमारे ८० ते ९० टक्के क्षेत्रावरील डाळिंबाचे नुकसान झाले आहे.

-पाणी शिरल्याने फळकुज
डाळिंबाचे प्रमुख्याने जूनमध्ये मृग, सप्टेंबरमध्ये हस्त आणि जानेवारीत अंबिया असे तीन बहार धरले जातात. तालुक्यात सर्वाधिक हस्त बहार अधिक धरला जातो. नेमक्या हस्त बहार मध्येच ढगफुटी सदृश्ा पाऊस झाला व प्रचंड नुकसान झाले. सततच्या पावसाच्या माऱ्याने फुलगळती आणि तयार झालेल्या फळात पाणी शिरल्याने फळकुजचे प्रकार झाले आहेत.

-पंचनामे करून भरपाई द्यावी
बागेत पाणी साठल्याने झाडांची मुळे कुजली आहेत. बहार धरल्यानंतर पहिल्या ६० दिवसात डाळिंब उत्पादकाचा सुमारे ७० टक्के खर्च होतो. पण आता हा सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसते. बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानझाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी,अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

अगोदरच तेल्या रोगाने बागा गेल्या. त्यात परतीच्या पावसाने बागांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु अजून प्रशासनाने पंचनामे केलेले नाहीत. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून भरपाई द्यावी.

- बंडू आटोळे, डाळिंब उत्पादक शेतकरी