आमची बदनामी थांबवा, नाहीतर… आमची कोणावरच तक्रार नाही म्हणत पूजाच्या वडिलांची माघार

आमची कोणावरच तक्रार नाही म्हणत तिच्या वडिलांची माघार घेतली. आमची कोणावरच तक्रार नाही, मला पाच मुली आहेत, आम्हाला जगू द्या असे अशी विनंती त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना केली आहे. तक्रारच नसल्यामुळे पूजा चव्हाण प्रकरण थंडावणार आहे.

    बीड: आमची कोणावरच तक्रार नाही म्हणत तिच्या वडिलांची माघार घेतली. आमची कोणावरच तक्रार नाही, मला पाच मुली आहेत, आम्हाला जगू द्या असे अशी विनंती त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना केली आहे. तक्रारच नसल्यामुळे पूजा चव्हाण प्रकरण थंडावणार आहे.

    पूजा चव्हाणने पुण्यातील वानवडी परिसरातील भाड्याच्या घरात आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

    पूजा चव्हाण प्रकरणात भाजपने थेट शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतले. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले. भाजपे राठोड यांच्यावर कारवाईची मागणीही केली.

    भाजपने रितसर तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, चौकशीची मागणी केली. इतकं सगळं होत असताना, पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांची ऑडिओ क्लिप समोर आली. एक-दोन नव्हे तर तब्बल १२ ऑडिओ क्लिपमुळे चक्रव्यूहात सापडलेले मंत्री संजय राठोड यांचं नावही उघड झाले.