पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी नवीन माहिती आली समोर ; संजय राठोड यांना निर्दोषत्त्व बहाल केल्याचे वृत्त निराधार- पोलीस उपायुक्त नम्रता पाटील

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास बंद (क्लोजर रिपोर्ट) करण्यात आलेला नाही," असे पोलिसांनी स्पष्ट केले.

    पुणे:पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी नवीन माहिती समोर आली असून आमची कोणाविरुद्ध तक्रार नाही असा जबाब पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी नव्याने नोंदवला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण केल्याचा अहवाल अद्याप सादर केलेला नाही. त्यामुळे तपास बंद करण्यात आलेला नाही. तपास सुरू असून अद्याप कोणालाही निर्दोषत्त्व बहाल करण्यात आलेले नाही, असे परिमंडळ-५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.

    बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या युवतीने वानवडीतील हेवन पार्क इमारतीतल्या सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना ७ फेब्रुवारीला घडली होती. या प्रकरणाशी तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास बंद (क्लोजर रिपोर्ट) करण्यात आलेला नाही,” असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणात संजय राठोड यांना निर्दोषत्त्व बहाल केल्याचे काही माध्यमांमधून आलेले वृत्त निराधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.