पुणे जिल्ह्यातील पावसाबाबत महत्त्वाची बातमी; पुढील चार दिवस…

बंगाल खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसाची शक्यता वाढली आहे. पुणे शहरात साेमवारी दिवसभर ढगाळ हवामान हाेते.

    पुणे : जिल्हा आणि शहरात पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. त्यानंतर काही दिवस ढगाळ हवामान राहील. तर घाटमाध्यावर जाेरदार पावसाची शक्यता आहे.

    बंगाल खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसाची शक्यता वाढली आहे. पुणे शहरात साेमवारी दिवसभर ढगाळ हवामान हाेते. अधूनमधून सूर्य दर्शन हाेते. तापमानातही वाढ झाली हाेती, सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. पुढील चार दिवस शहरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

    बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काेकण, मुंबई, पालघर जिल्ह्यात पुढील चार दिवसांत जाेरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विशेषत: नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा विभागात जाेरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही स्थिती नऊ तारखेपर्यंत राहू शकते. त्यानंतर पावसाचा जाेर कमी हाेण्याची शक्यता आहे.