बासमती तांदळाच्या उत्पादनावर परीणाम होण्याची शक्यता ; शेतकऱ्यांना सोसावे लागणार आर्थिक नुकसान

देशात बासमती तांदळाचे उत्पादन १९ ते २० लाख हेक्टर जमीनीवर घेतले जाते. परंतू ह्यावर्षी मात्र पेरणीचे प्रमाण ५ ते ८ % कमी होण्याची शक्यता आहे. बासमतीचे उत्पादन प्रति हेक्टरी ५० ते ६० क्विंटल होत असते. एक हेक्टरला जास्तीत जास्त ६५ क्विंटल पर्यंत उत्पादन येऊ शकते.

    पुणे : तांदळाची आधारभूत किंमत कमी असल्याने यावर्षी बासमती तांदळाच्या उत्पादनावर परीणाम हाेऊ शकताे असा अंदाज फेडरेशन ऑफ असाेिसएशन ऑफ महाराष्ट्रचे वरीष्ठ उपाध्यक्ष आणि व्यापारी राजेश शहा यांनी व्यक्त केला आहे.देशांत बासमती हा सर्वात जास्त उत्पादित होणारा तांदूळ आहे आणि त्याच प्रमाणे तो जगात सर्वात जास्त निर्यात केला जाणारा तांदूळ आहे. आपण साधारणतः दर वर्षाला २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा बासमती तांदूळ जगभरात निर्यात करतो. हा तांदुळ देशात सात राज्यांतील ९५ जिल्ह्यांमध्ये उत्पादित होतो. त्यामध्ये पंजाब, हरियाणा, जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि पश्चिमी उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये उत्पादित होतो. यावर्षी केंद्र सरकारने तांदळाच्या भाताचे न्यूनतम आधारभूत किंमत (MSP) १ हजार ८८६ रुपये ते १ हजार ८८८ रुपये असा निश्चित केला आहे. परंतू गेल्या संपूर्ण वर्षभरात शेतकऱ्यांना बासमतीच्या भाताचे भाव दाेन हजार रुपये ते २ हजार ४०० रुपयापर्यंत मिळाले. शेतकऱ्यांना साधारण तांदळाच्या उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा बासमती तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी खूप जास्त खर्च येतो. साधारण तांदळाच्या बियाणां पेक्षा बासमती तांदळाचे बियाणे खूप महाग असतात. शिवाय साधारण तांदळापेक्षा बासमती तांदळाचे उत्पादन येण्यासाठी वेळही खूप जास्त लागतो. साधारण तांदळाचे बियाणे जमीनीत पेरल्यापासून तीन महिन्यात तांदूळ उत्पादित होतो. तर बासमती तांदळाला चार महिने लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना भाताची जास्त काळजी घ्यावी लागते. हे सर्व बघता बासमती भाताचे भाव साधारण तांदळापेक्षा दीडपट किंवा दुप्पट मिळाले नाही तर शेतकरी बासमतीचे उत्पादन कमी करतील, त्याचा परीणाम बासमतीच्या उत्पादनावर हाेईल. तसेच बासमतीच्या बियाण्यांची विक्री पण गेल्या वर्षीपेक्षा ५ ते १० % कमी झाली आहे. त्यामुळे बासमतीचे उत्पादन पण गेल्या वर्षीपेक्षा ५ ते १० % कमी येण्याची शक्यता शहा यांनी व्यक्त केली आहे.

    देशात बासमती तांदळाचे उत्पादन १९ ते २० लाख हेक्टर जमीनीवर घेतले जाते. परंतू ह्यावर्षी मात्र पेरणीचे प्रमाण ५ ते ८ % कमी होण्याची शक्यता आहे. बासमतीचे उत्पादन प्रति हेक्टरी ५० ते ६० क्विंटल होत असते. एक हेक्टरला जास्तीत जास्त ६५ क्विंटल पर्यंत उत्पादन येऊ शकते. या सर्व कारणांमुळे किंग ऑफ राईस – बासमती तांदळाचे उत्पादन ह्यावर्षी ५ ते ८ % कमी येण्याची शकता आहे. अशी माहिती जयराज ग्रुपचे संचालक व फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी दिली.