मराठा आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत नोकरभरती स्थगित करण्याची शिवबा संघटनेची मागणी

शिक्रापूर-नगर महामार्गावर शिवबा संघटनेच्या वतीने रस्ता रोको
शिक्रापूर: मराठा आरक्षणाबाबत शिवबा संघटनेच्यावतीने राज्यभरात ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत असताना शिक्रापूर येथे (दि.९) ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास मराठा आरक्षणाचा निकाल लवकरात लवकर लावण्यात यावा यासाठी शिवबा संघटनेच्या वतीने आंदोलन करत पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
– नोकर भरती करण्यात येऊ नये
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शिवबा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष गोविंद कुमकर यांच्या आयोजना नुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिक्रापूर येथील चाकण चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पुढील आठ दिवसांमध्ये मराठा आरक्षणाबाबत सरकारने दखल घेतली नाही तर एकही राजकीय नेत्याला रस्त्यावर फिरू देणार नसल्याबाबतचा इशारा शिवबा संघटनेच्या वतीने देण्यात आला. मराठा आरक्षणाचा निकाल लागे पर्यंत कोणतीही नोकर भरती करण्यात येऊ नये, अशी मागणीही यावेळी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी शिवबा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र जराड पाटील, प्रदेशाध्यक्ष गणेश शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष गोविंद कुमकर, युवती प्रदेशाध्यक्षा दिव्या पाटील, संपर्कप्रमुख देविदास पाठे पाटील, नवी मुंबई संपर्कप्रमुख नितीन शिंदे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर देवडे पाटील, विस्तारक हरीभाऊ केसभट, पुणे कार्याध्यक्ष दिलीप वायकर, नांदेड जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे, गंगाराम शिंदे, सुनील राजपूत, महिला पुणे जिल्हाअध्यक्षा मंगल शिंदे, अर्चना शितोळे, श्रीराम कुरमकर, गणेश पवार, दत्तात्रय भुसणे, शिवाजी वरपे यांसह आदि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिक्रापूर पोलिसांना निवेदन देत आंदोलनाची