वसुलीसाठी वीज कंपनीचा ग्राहकांना ‘शॉक’

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी लक्ष्मण चव्हाण यांनी सांगितले की महावितरणकडून थकीत वीजबील हप्त्यांत भरण्याचे सुविधेबाबत ग्राहकांत संभ्रम आहे. काही ठिकाणी ग्राहकांना प्रिंटेंड बिल मिळत नाहीत, काहींना केवळ मेसेज पाठविले जातात ते ग्राहकांना मिळतीलच असे नाही. यातून वीजबील थकीत राहत असल्याचे प्रकार घडतआहेत. यासाठी अधिकार्यांना भेटण्यासाठी नागरिक महावितरणच्या कार्यालयात येतात परंतु, ते जागेवर नसतात तसेच त्यांचा फोनही सतत स्विच ऑफ असल्याची तक्रार चव्हाण यांनी केली आहे.

    थेऊर : वीजबील थकल्याप्रकरणी पुर्व हवेलीत महावितरणने वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू केला असून करोना काळातील थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी विज वितरण कंपनीने नागरिकांना मोठा शॉक दिल्याने वीजग्राहक हवालदिल झाले आहेत. याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांचे करोना काळातील थकीत रक्कम टप्या टप्याने घ्यावे व वीज कनेक्शन कट करु नये असे निवेदन विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

    पुर्व हवेलीतील उरूळी कांचन, सोरतापवाडी, थेऊर,कुंजीरवाडी, नायगाव, कोरेगाव मुळ, कोलवडी,लोणी काळभोर, पेठ,कदमवाकवस्ती,वळती, तरडे,आळंदी म्हातोबाची इत्यादी भागात थकीत वीजबिल प्रकरणी वसुलीसाठी नागरिकांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यास सुरुवात केली आहे. अधिकारी व कर्मचारी मार्च महिना व वसुलीचे उद्दिष्ट हे कारण देऊन कनेक्शन कट करत आहेत.

    याविषयी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी लक्ष्मण चव्हाण यांनी सांगितले की महावितरणकडून थकीत वीजबील हप्त्यांत भरण्याचे सुविधेबाबत ग्राहकांत संभ्रम आहे. काही ठिकाणी ग्राहकांना प्रिंटेंड बिल मिळत नाहीत, काहींना केवळ मेसेज पाठविले जातात ते ग्राहकांना मिळतीलच असे नाही. यातून वीजबील थकीत राहत असल्याचे प्रकार घडतआहेत. यासाठी अधिकार्यांना भेटण्यासाठी नागरिक महावितरणच्या कार्यालयात येतात परंतु, ते जागेवर नसतात तसेच त्यांचा फोनही सतत स्विच ऑफ असल्याची तक्रार चव्हाण यांनी केली आहे.

    राघवदास चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष,अखिल भारतीय ग्राहक पंचायत :- लाखो रुपयांची वीजबिल थकवणा-या काही व्यापा-यांना सुट दिली जाते अथवा त्यांचेवर प्रत्यक्ष कारवाई होत नाही.मात्र सर्वसामान्यांच्या घरगुती वीज वापराचे कनेक्शन तोडले जाते.करोना व अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग अगोदरच मेटाकुटीला आला आहे त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांचा विचार करावा याविषयी वरिष्ठ अधिका-यासोबत चर्चा करणार आहोत.