भोरमध्ये पावसामुळे वीज पुरवठा खंडीत

भोर: मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह तालुक्यातील पूर्व भाग,वेळवंड,हिर्डोशी,विसगाव खो-यातील वीज पुरवठा बंद पडला.मंगळवारी सायंकाळपासून वारा व पावसामुळे बहुतांश

भोर: मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह तालुक्यातील पूर्व भाग,वेळवंड,हिर्डोशी,विसगाव खो-यातील वीज पुरवठा बंद पडला.मंगळवारी सायंकाळपासून वारा व पावसामुळे बहुतांश ठीकाणच्या उच्च व लघुदाब वाहीण्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला.  त्यामुळे तालुक्यात सर्वच भागातील वीज गेली.बुधवारी सकाळपासून पाउस सुरूच आहे.तरीही वीज महामंळाच्या कर्मचा-यांनी दुरूस्तीचे काम युध्द पातळीवर सुरू केले.शहरातील वीज पुरवठा दुपारी एक तर तर इतर भागातील टप्याटप्याने सायंकाळी पांच वाजेपर्यंत सुरू झाला.वीज मंडळाच्या ६५ तर ठेकेदाराच्या २० कर्मचा-यांनी आठ अभियंत्यांच्या मार्गदर्शना खाली सलग चौदा तास हे काम केल्याचे उपअभियंता संतोष चव्हाण यांनी सांगितले.सकाळी आठ वाजेपर्यंत शहरात सात तर भाटघर येथे आकरा मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. शहरातील दैंनदिन जीवन शांत होते.अंबाडे येथील प्रवेशव्दाराची लोखंडी कमान वादळामुळे पडली.