prakash-ambedkar-administrative-challenges-after-covid

सरकार टिकवायचं की नाही हे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ठरवावं, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीही (Prakash Ambedkar) धनंजय मुंडेंच्या बलात्काराच्या आरोपांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

पुणेः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचं आरोप झाल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील मुंडेंवर प्रतिक्रिया दिली असून आरोपांचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असा इशारा पवारांनी दिला आहे. दरम्यान, सरकार टिकवायचं की नाही हे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ठरवावं, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीही (Prakash Ambedkar) धनंजय मुंडेंच्या बलात्काराच्या आरोपांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी मुफ्ती, मौलाना यांची भेट घेतली, त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. मुंडे यांचा राजीनामा हा कोर्टाचा विषय आहे, लोक निवडणूक आयोगाकडे का जातात?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. सरकार टिकवायचे की नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवायला हवं. शरद पवार म्हणाले हा गंभीर गुन्हा आहे हा कसा घ्यावा हे मुंडे यांनी ठरवावं.

राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही. राजकारणी ज्ञानी असतो पण काही साधायचे असेल तर तो अज्ञानाचे सोंग घेतो, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला आहे.