Complaint of quarreling couple, marriage arranged by police
The illustration shows the silhouette of a woman and man in an argument in Berlin, Germany, 8 January 2013. Photo: Jan-Philipp Strobel

मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून आईवडीलांच्या घरी माहेरी गेल्या. आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसुन फिर्यादी व फिर्यादी यांच्या माहेच्या लोकांना शिवीगाळ करून, लाकडी काठी व दगडी वरवंठ्याने मारहाण करुन जखमी केले

    पिंपरी: शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून माहेरी गेलेल्या गरोदर पत्नीला व पत्नीच्या कुटुंबीयांना दगडी वरवंट्याने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी घटना घडल्याचा प्रकार काळेवाडी व पिंपरी याठिकाणी हा प्रकार घडला. रुमचे भाडे, पेट्रोल भरण्यासाठी तसेच फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन पैसे घेऊन यावे म्हणून पती पत्नीचा सातत्याने छळ करत होता. या प्रकरणी पिडित महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    त्यानुसार पती अतुल राजाराम माने (वय ३४ काळेवाडी, पुणे), दीर विवेक राजाराम माने (वय २८, काळेवाडी), ५० वर्षीय सासु व दोन नणंद यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ४९८ (अ), ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीने रुमचे भाडे भरण्यासाठी, गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तसेच फ्लॅट घेण्यासाठी फिर्यादी यांच्या आईवडीलांकडून पैसे घेवून येण्यास सांगितले. त्याला फिर्यादी यांनी नकार दिल्याने त्याचा राग मनात धरुन फिर्यादीस लाकडी दांडक्याने, लाथाबुक्याने प्रचंड मारहान करुन फिर्यादीस जखमी केले व घरातुन हाकलून दिले. तसेच, फिर्यादी गरोदर असताना ‘आम्हाला हे बाळ नको आहे, पाडुन टाक’, असे बोलून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

    फिर्यादी महिला मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून आईवडीलांच्या घरी माहेरी गेल्या. आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसुन फिर्यादी व फिर्यादी यांच्या माहेच्या लोकांना शिवीगाळ करून, लाकडी काठी व दगडी वरवंठ्याने मारहाण करुन जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक अवधूत शिंगारे करीत आहेत.