प्रेमसुख कटारिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

    दौंड / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दौंड नगरपालिकेचे माजी शहराध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांचा ७८ वा वाढदिवस दौंड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    प्रेमसुख कटारिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पतित पावन संघटना व के. के. आय इन्स्टिट्यूट बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन स्वातंत्र्य सैनिक कै. विद्याभूषण किसनदास कटारिया नागरी पतसंस्थेचे चेअरमन रमेश कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिबिरातील २५० रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले तर ३९ जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

    हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पतित पावन संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजेश पाटील, रोहित पाटील, योगेश कटारिया, दौंड नगरपालिकेतील नागरिक हित संरक्षण मंडळाचे गटनेते बबलू कांबळे, नगरसेवक प्रमोद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेमसुख कटारिया यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आले होते .