गणेशोत्सवाबरोबरच ‘इच्छुकां’ची तयारी ; गणेशभक्ती शहरात ठरला चर्चेचा विषय

सध्या गणेशाेत्सवाची जाेरदार तयारी शहरात सुरु झाली आहे. गणेश मंडळांचे कार्यकर्ते मंडप, सजावटीच्या कामात गुंतले अाहेत. घरगुती गणपतीकरीता आरस करण्यासाठी साहीत्य खरेदीला बाजारात गर्दी वाढली आहे. तसेच शहरांत विविध ठिकाणी गणेशमुर्ती विक्रीचे स्टाॅल गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. प्लॅस्टर अाॅफ पॅरीस (पीओपी ) आणि शाडूमातीच्या मुर्ती उपलब्ध झाल्या आहेत.

    पुणे : आगामी महापािलका निवडणुकीत इच्छुक उमेदवार असलेल्या कार्यकर्त्यांकडून कमी किंमतीत गणेश मुर्ती विक्रीचे उपक्रम राबविण्यावर भर दिल्याचे चित्र आहे. त्यांची गणेशभक्ती शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

    सध्या गणेशाेत्सवाची जाेरदार तयारी शहरात सुरु झाली आहे. गणेश मंडळांचे कार्यकर्ते मंडप, सजावटीच्या कामात गुंतले अाहेत. घरगुती गणपतीकरीता आरस करण्यासाठी साहीत्य खरेदीला बाजारात गर्दी वाढली आहे. तसेच शहरांत विविध ठिकाणी गणेशमुर्ती विक्रीचे स्टाॅल गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. प्लॅस्टर अाॅफ पॅरीस (पीओपी ) आणि शाडूमातीच्या मुर्ती उपलब्ध झाल्या आहेत. एकीकडे सार्वजनिक पातळीवर गणेशाेत्सवाची तयारी सुरु असतानाच महापािलका निवडणुकीत उमेदवारी मिळविण्याची तयारी असणाऱ्यांकडूनही गणेशाेत्सवाच्या निमित्ताने अनाेखा उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. मनसेचे पदाधिकारी प्रल्हाद गवळी यांनी नुकतेच ‘मुर्ती आमची किंमत तुमची’ असा उपक्रम राबवून चार हजार गणेशमुर्तींची विक्री केली. नागरीकांनी कलशात एैच्छिक रक्कम टाकून आपल्या पंसतीची मुर्ती घरी नेली. याच प्रकारचे उपक्रम शहराच्या उपनगरांत इच्छुकांकडून राबविले जाऊ लागले आहे. बिबवेवाडी येथे एका इच्छुकाने माेफत मुर्ती देण्याचा उपक्रम राबविला आहे. तसेच मुंकुंदनगर भागातही साेमवारी असाच उपक्रम सुरू झाला. काॅंग्रेसचे कार्यकर्ते भरत सुराणा यांनी घरगुती ‘श्रीं’ची मुर्ती पाच रुपयाला एक मुर्ती विक्रीचा उपक्रम राबविला. या मुर्ती बराेबरच मास्क, सॅनिटायझरची बाटली आणि आरती संग्रहाचे पुस्तकही भेट दिले जात आहे. पाचशे पंच्चावण्ण मुर्ती या उपक्रमात विक्री केली जाणार आहे.

    ‘‘ काेराेनामुळे आर्थिक संकट अनेकांसमाेर उभे राहीले आहे. आम्ही काम करीत असलेल्या भागांत झाेपडपट्टी आणि मध्यमवर्गीय नागरीक माेठ्या प्रमाणावर आहे. त्यांना गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी मदत म्हणून हा उपक्रम राबविला.

    -भरत सुराणा