सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात पावसाची हजेरी

पुणेकरांना मिळाला दिलासा पुणे: हवामानातील घडामोडींमुळे सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी दिवसभर आकाशात ढग दाटून आले होते आणि थंड वारे सुटल्यामुळे वातावरणात गारवा

पुणेकरांना मिळाला दिलासा


पुणे:  हवामानातील घडामोडींमुळे सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी दिवसभर आकाशात ढग दाटून आले होते आणि थंड वारे सुटल्यामुळे वातावरणात गारवा जाणवत होता. उकाड्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी दिलासा मिळाला.
 
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात दोन दिवस पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता. त्यानुसार रविवारी दुपारनंतर कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यामध्ये रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यांसही विजांचा कडकडाट सुरू होता; मात्र पावसाचा हलका शिडकावा झाला.
सोमवारी सकाळी ढगाळ वातावरण होते आणि दहानंतर सिंहगड रस्ता, कात्रज, कोंढव्यासह काही भागात पावसाने हजेरी लावली. तासभर पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारनंतर शहरात सगळीकडेच पावसाच्या सरींचा हलका शिडकावा झाला. दिवसभर गार वारे असल्याने उकाडा कमी झाला होता. वातावरणातील बदलांमुळे तापमानात लक्षणीय घट झाली. पुण्यात सोमवारी दिवसभरात कमाल आणि किमान तापमान नोंदविण्यात आले. पुण्यामध्ये मंगळवारी दिवसरात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
-कमाल तापमान ९ अंशाने घटले
शहरात गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमान ३७.५ ते ३८ अंश सेल्सिअसमध्ये रेंगाळले होते. रविवारी संध्याकाळनंतर बदलेल्या वातावरणामुळे तापमान लक्षणीय घट झाली. मंगळवारी दिवसभरात कमाल तापमान २८.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच कमाल तापमान एवढे कमी नोंदविण्यात आले. किमान तापमानातही चार अंशाने घट होऊन २१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
————————-