अनेक दिवसांच्या विश्रांतीनगर पुण्यात पावसाची हजेरी ; शहरांत ११.७ मिलीमीटर पावसाची नाेंद

महाराष्ट्राची किनारपट्टी आणि कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झशला आहे. गेल्या चाेवीस तासांत काेकण- गावा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

    पुणे : अनेक दिवसांच्या विश्रांतीनगर साेमवारी शहरांत पावसाने दिवसभर हजेरी लावली. खडकवासला धरणसाखळी क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे. संध्याकाळपर्यंत शहरांत ११.७ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली.

    महाराष्ट्राची किनारपट्टी आणि कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झशला आहे. गेल्या चाेवीस तासांत काेकण- गावा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली हाेती. रविवार संध्याकाळपासून शहरात पावसाने पुन्हा हजेरी लावली असुन, साेमवारी दिवसभर हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत हाेता. पुढील तीन दिवस शहरांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा आणि घाट विभागात तुरळक ठिकाणी जाेदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, खडकवासला धरण साखळीतील वरसगांव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला धरण क्षेत्रात पावसाने गेले दाेन दिवस समाधानकारक हजेरी लावली आहे. यामुळे या धरणसाखळीतील एकुण साठा हा साडे दहा टिएमसीपर्यंत पाेचला आहे. एकुण टक्केवारीचा विचार करता हा साठ्याचे प्रमाण ३६ टक्के इतके झाले आहे. खडकवासला धरण क्षेत्रात १८ मिमी, पानशेत (३२), वरसगांव ( ४० ) आणि टेमघर धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात ४५ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे.