शहराच्या विविध भागांत परतीच्या पावसाची हजेरी

तळेगाव दाभाडे:  ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट यांचेसह मान्सूनच्या परतीच्या जोरदार पावसाने तळेगाव परिसराला झोडपून काढले. गेली सात-आठ दिवस पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. मात्र काल रात्रीपासून पावसाळी वातावरण पुन्हा दिसू लागले. तर दुपारी दोन नंतर वाळवायचे पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांचा गडगडात आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळू लागल्या. या पावसाने तासभर जनजीवन विस्कळीत झाले. तळेगाव शहरातील रस्त्यावरून पाणी वाहत होते. तर सगळ्या गटारी भरून वाहत होत्या. या पावसाने पूर्व मावळ तालुक्यातील खरीप भात पिकांना धोका होण्याची शक्यता वर्तविली जात असून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या पुढे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
जोरदार पावसाने काही ठिकाणी भात खाचरात पाणी साचू लागले असून भात कापणीस ते त्रासदायक असल्याचे शेतकरी वर्गाकडून समजले जाते.
-वीज पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित
काही शेतकरी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या रब्बी पिकांच्या पेरण्यासाठी पूर्वतयारीच्या मशागतीच्या कामाला लागला होता. या पावसाने तूर्तास ही कामे लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग काळजीत पडला आहे. शुक्रवारी रात्रीच्या वेळी तळेगाव परिसरामध्ये लेक पँराडाईज परिसरामध्ये कडकडाट करणारी वीज पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. या मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु परिसरातील वीजपुरवठाबराच काळ खंडित झाला होता. तो रात्री उशिरा चालू करण्यात आला,अशी माहिती सहाय्यक अभियंता गजानन झोपे यांनी दिली.कर्जत तालुक्यातील चार मंडलात अतिवृष्टी झाली आहे. या पावसाने पिकांची नासाडी झाली असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विष्णू देमुंडे यांनी केली आहे. शहरासह तालुक्यातील साह मंडलातील अनेक ठिकाणी शनिवारी रात्री १०.३० वाजता सुरू झालेला पाऊस सकाळी ६ वाजेपर्यंत होता. रात्री पासून जोरदार पाऊस कोसळला. विजेचा कडकडाट इतका प्रचंड होता, की अवघे शहर दुमदुमून जात होते, काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते.
-शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी
गेले दोन दिवस उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला होता. दिवसभर उष्मा वाढत आहे. शनिवारी सकाळी धुके पडले होते. त्यानंतर उन्हाचा कडाका सुरू झाला. कर्जत चे कमाल तापमान ३० डिग्रीच्या वर पोहोचल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे सायंकाळी पाऊस दणकणार हे निश्चित होते. संध्याकाळी ६ वाजल्यापासून मेघगर्जना सुरू झाल्या आणि रात्री १०.३० ला सुरुवात झाली. पूर्वेकडून पाऊस सुरू झाला. साधारणतः रात्री १२ ते ३ वाजता शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजेचा कडकडाट इतका प्रचंड होता, की वीज अंगावर पडते की काय, असे वाटत होते. मेघगर्जनेसह पावसाने झोडपून काढले.
-नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली
शहरात एकसारखा पाऊस सुरू राहिल्याने व रात्री अचानक वीज बंद झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता सतत विजेचा गडगडाट होत असल्याने भीतीही वाटत होती. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बंगालची खाडी व अंदमान निकोबारमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस होत आहे. मंगळावरपर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.