Prime Minister Modi arrives at Siram Institute

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. कंपनीचे मालक असलेले अदार पुनावाला आणि सायरस पुनावाला यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.  

पुणे : कोरोना लस निर्मितीत भारतीय औषध निर्मात्या कंपन्याही आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपन्यातील संशोधकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि कोरोना लसीची माहिती जाणून घेण्यासाठी दौरा आयोजीत केला.  सर्वप्रथम मोदींनी अहमदाबादच्या झायडस कॅडिला कंपनीच्या प्रकल्पाला भेट दिली. इथे झायकोव्ही-डी लशीची निर्मिती सुरु आहे. ही स्वदेशी लस आहे. अहमदाबादनंतर पंतप्रधानांनी हैदराबादमधील भारत बायोटेकला (Bharat Biotech) भेट दिली.  त्यानंतर ते आता पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटमध्ये दाखल झाले.  कंपनीचे मालक असलेले अदार पुनावाला आणि सायरस पुनावाला यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी सिरम इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांबरोबर तासभर चर्चा केली.

सिरम आणि ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक

पंतप्रधान मोदी सिरममध्ये दाखल झाल्यानंतर सीईओ अदर पूनावाला यांनी मोदींनी सिरमची कार्यपद्धती समजावून सांगितली. मोदींनी यावेळी करोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी आता पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये येऊन कोविशिल्ड प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून झायडसच्या टीमचे कौतुक

“आज अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कचा (Zydus Biotech Park) दौरा करुन, स्वदेशी DNA आधारीत लशीबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. करोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या टीमचे मोदींनी कौतुक केले. या प्रवासात भारत सरकार त्यांच्यासोबत मिळून काम करत आहे” असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे. मोदींनी लस निर्मितीचे काम समजून घेताना झायडसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही केली.

अहमदाबादनंतर पंतप्रधानांनी हैदराबादमधील भारत बायोटेकला (Bharat Biotech) भेट दिली.