narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानाने दुपारी १२.३० वाजता लोहगाव विमानतळावर उतरतील. यानंतर ते हेलिकॉप्टरने सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जातील. मोदी जेव्हा पुण्यात दाखल होती. तेव्हापासून मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी ही पुणे पोलीस आणि विशेष सुरक्षा दलावर असणार आहे.

  • या सुचनेमुळेच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांचे आगमन व दौऱ्यात उपस्थित राहणार नाहीत

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) आज पुण्यासह अहमदाबाद आणि हैदराबाद दौऱ्यावर आहेत. कोरोना लसीच्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीची माहिती घेणार आहेत. सकाळीच पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबाद येथील कोरोना लस निर्मात्या कंपनीचा भेट देऊन आढावा घेतला. मोदी सायंकाळी ४.३० च्या सुमारास पुण्यात दाखल होणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज आहे. तसेच मोदींच्या सुरक्षेची ( Modi’s security) जबाबदारी पुणे पोलीस आणि विशेष सुरक्षा दलावर असणा (SPG)र आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी एअर इंडिया वन या विममानाने पुण्यात दाखल होणार आहेत. पंतप्रधानांच्या प्रवासासाठी नुकतेच बोईंग ७७७ ही दोन विमाने दाखल झाली आहेत. या विमानांना एअर इंडिया वन असे नाव ठेवण्यात आले आहे. यातील एका विमानाने मोदी दौरा करणार आहेत. देशातील कोरोना लसींच्या निर्मितीबाबत मोदी आढावा घेणार आहेत. कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात १०० देशांच्या राजदूतांचा समावेश असणार आहे. त्यामुळे हा दौरा फार महत्त्वपूर्ण ठरत आहे.

या सुचनेमुळेच पंतप्रधानांच्या आगमन व दौऱ्यात मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत

मा पंतप्रधान हे आपल्या पुणे दौऱ्यात अगदी छोट्या कालावधीसाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून लगेच परतणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही असे पंतप्रधान कार्यालयाकडूनच कळविण्यात आले आहे .

असा असेल मोदींचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानाने दुपारी १२.३० वाजता लोहगाव विमानतळावर उतरतील. यानंतर ते हेलिकॉप्टरने सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जातील. मोदी जेव्हा पुण्यात दाखल होती. तेव्हापासून मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी ही पुणे पोलीस आणि विशेष सुरक्षा दलावर (special security forces) असणार आहे.

सुरक्षा दल कुठल्याही प्रसंगी मोदींच्या सुरक्षेसाठी सक्षम

विशेष सुरक्षा दलात असलेल्या कमांडोंना अतिशय कठिण प्रशिक्षण दिले जाते. त्यांना सर्व प्रकारची हत्यारे आणि आधुनिक हत्यारेंची ओळख असते. या दलाकडे सर्वात आधुनिक गाड्यांचा ताफा या बालकांकडे असतो. तसेच कोणत्याही प्रकारच्या हल्लात बचावासाठी या दलातील जवानांना प्रशिक्षण दिले जाते. या दलाचा प्रमुख डायरेक्टर जनरल दर्जाचा आयपीएस अधिकारी असतो. या अधिकाऱ्याचे कार्यालय दिल्ली येथील पंतप्रधान निवासात असतो.