प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मोशी येथे ओम गुरुदत्त व्हिडिओ गेम पार्लर आहे. चालक पाटील हा व्हिडिओ गेम मशीनवर जुगार खेळत होता. त्याच्याकडून १ लाख १३ हजार रूपये किमतीच्या मशिन व रोकड जप्त करण्यात आली आहे.

    पिंपरी: भोसरी एमआयडीसी पोलिसांनी शाहूनगर, मोशी येथे तीन ठिकाणी छापे टाकून इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेमद्वारे खेळल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ३० मशीन जप्त करून ११ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
    शाहूनगर येथील सत्यम मार्केट टमध्ये दोन कारवाया करण्यात आल्या. पहिल्या कारवाईत व्हिडिओ गेम पार्लर चालक अभिजित राजेंद्र सोळंके (वय ३२, रा. काळेवाडी फाटा, वाकड), कामगार सुरेश महादु ठाकूर (वय ५१, रा. कुदळवाडी), जुगार खेळणारा अमोल दिलीप वायकर (वय २९, रा. चिखली) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून साडेतीन हजाराची रोकड आणि एक लाखाच्या १० मशिन जप्त करण्यात आल्या.

    दुसऱ्या कारवाईत व्हिडिओ गेम पार्लर मॅनेजर अजित संभाजी जाधव (वय २१, रा. मोहननगर, चिंचवड), कामगार आदेश बाळाजी जाधव (वय २०, रा. दत्तनगर, निगडी), जुगार खेळणारे नितीन ज्ञानोबा मोरे (वय ४०, रा. चिखली), सागर विजय महापुरे (वय ३५, रा. दत्तनगर, चिंचवड), किरण विठ्ठल साळुंखे (वय २६, रा. मोहननगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून ८०० रूपयांची रोकड आणि एक लाखाच्या १० मशिन जप्त करण्यात आल्या. मोशी येथे केलेल्या तिसऱ्या कारवाईत बाळगोंडा पायगोंडा पाटील (वय ४०, रा. मरकळ), दिनेश सूर्यभान भोळे (वय २७, रा. कुरुळी, ता. खेड), श्रीनिवास चंद्रकांत त्रिबंके (वय २८, रा. मोशी) या तिघांवर गुन्हा दाखल केला.

    मोशी येथे ओम गुरुदत्त व्हिडिओ गेम पार्लर आहे. चालक पाटील हा व्हिडिओ गेम मशीनवर जुगार खेळत होता. त्याच्याकडून १ लाख १३ हजार रूपये किमतीच्या मशिन व रोकड जप्त करण्यात आली आहे.