अशिक्षित उमेदवारांस प्राधान्य

माळशिरस: पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झालेला असताना बहुतांश ग्रामपंचायतीत गाव गाव पुढाऱ्यांना अशिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले असल्याचा प्रकार घडताना दिसत आहे.

 

माळशिरस: पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झालेला असताना बहुतांश ग्रामपंचायतीत गाव गाव पुढाऱ्यांना अशिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले असल्याचा प्रकार घडताना दिसत आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायतीचे बिगुल वाजलेले असताना प्रत्येक गावात गावपुढार्यांना आपल्याच हाती सत्ता असावी असा चंग बांधलेला आहे. तसेच आपल्या गावात ज़र एखादा सुशिक्षित उमेदवार ज़र सरपंच,उपसरपंच किंवा सदस्य न व्हावा या आकसेपोटी गावपुढार्यांनी आपले ऐकणारा आपल्यापुढे झुकणार्या अशिक्षित उमेदवारास प्राधान्य देण्याचा घाट घातला आहे. गावचा विकास व गावची प्रतिमा ह्या गावपुढार्यांना कधी वाढवायची असते का? हे गावातील नागरिकांना कधी कळलेच नाही. परंतु गावपुढार्यांच्या दबावाखाली बरेचशे मतदारही ह्या गोष्टींना कधी विरोध करत नाहीत पण ज़र गावच्या ग्रामपंचायतीत अशिक्षित उमेदवार निवडुण आले तर गावचा विकास व्हायचा लांबच राहिला पण गावपुढारीच गावचे मालक होतील असे मत प्रत्येक गावातील मतदारांचे आहे.

पण आपण स्वत:च अशिक्षित असल्याने सुशिक्षित उमेदवारांना संधी का द्यावी? याउलट गावपुढार्यांना एकच कळत की सुशिक्षित उमेदवार ज़र निवडुन आल्यावर गावच्या ग्रामपंचायतमध्ये बसल्यावर आपले गावातील अस्तित्व राहणार नाही व आपल्याला सामान्य माणसं किंमत देणार नाहीत. त्यामुळेच गावच्या राजकारणात सुशिक्षित उमेदवाराला किंमत नाही हेच आजच्या ग्रामपंचायत निवडणुकांमधल्या उमेदवारांच्या चाचपणीवरुन दिसते.