Billions of cocaine seized Four Nigerian accused arrested

बारामती शहरातील व्यापारी प्रितम शहा लेंगरेकर यांना व्याजाच्या पैशासाठी त्यांचे सहयोग सोसायटीमधील घर लिहून घेतल्यामुळे आणि मानसिक त्रास दिल्यामुळे त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांनी लिहलेल्या सुसाईड नोटवरून ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे : बारमती येथील प्रसिद्ध व्यापारी प्रीतम शहा यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक जयसिंग ऊर्फ बबलू देशमुख यांच्या सह सहा जणांच्या पोलिस कोठडीत वाढ झाली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

प्रितम शशिकांत शहा-लेंगरेकर यांच्या आत्महत्ये प्रकरणी नगरसेवक जयसिंह उर्फ देशमुख, बारामती बाजार समितीचे माजी सभापती संजय काटे,  कुणाल काळे,  प्रविण गालिंदे,  हनुमंत गवळी, सनी आवाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना यापूर्वी बारामतीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.आर. वाघडोळे यांच्यापुढे सुनावणी झाली.

यावेळी सरकारी वकील  श्रीकांत पोंदकुले यांनी सरकार पक्षाची बाजू मांडताना या आरोपींकडून आणखी तपास करावयाचा असून त्यांनी केलेले अन्य व्यवहार तपासायाचे आहेत, त्यामुळे त्यांना पोलिस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी केली. त्यास बचाव पक्षाच्या वतीने अॅड. राजेंद्र काळे व अॅड. डी.डी. शिंदे यांनी विरोध केला. एक वर्षापूर्वी झालेल्या जमीन खरेदी व्यवहारात फिर्यादीची देखील स्वाक्षरी व मान्यता असताना एक वर्षानंतर झालेल्या आत्महत्येबद्दल कसे जबाबदार धरता येईल, असा युक्तीवाद त्यांनी आरोपींच्या वतीने करीत पोलिस कोठडीस विरोध दाखवला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधिशांनी सहा जणांची पोलिस कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढवली.

बारामती शहरातील व्यापारी प्रितम शहा लेंगरेकर यांना व्याजाच्या पैशासाठी त्यांचे सहयोग सोसायटीमधील घर लिहून घेतल्यामुळे आणि मानसिक त्रास दिल्यामुळे त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांनी लिहलेल्या सुसाईड नोटवरून ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी(दि १८) जयसिंग उर्फ बबलू देशमुख, जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे, संजय कोंडीबा काटे, हनुमंत सर्जेराव गवळी, प्रवीण दत्तात्रय गालिंदे, सुनील उर्फ सनी आवाळे यांना अटक करण्यात आली.