रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी खासगी रूग्णालयाचा डॉक्टर गजाआड

आरोपींपैकी शशिकांत हा डॉ. सचिनचा भाऊ असून त्याचेही आयुश्री नावाने मेडीकल आहे. चिंचवड येथील ओनेक्स आणि क्रिस्टल या दोन्ही रूग्णालयांच्या नावाने आयुश्री आणि गोदावरी मेडीकल स्टोअर्स मार्पâत प्राप्त झालेले रेमडेसिवीर इंजेक्शन डॉ. सचिनचा भाऊ शशिकांत याच्या मध्यस्थीने तसेच कृष्णा पाटील व निखील नेहरकर याच्या मार्पâत काळया बाजारात विकली जात होती.

    पिंपरी :  रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना वाकड पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर पोलीस तपासात रूग्णालयाच्या डॉक्टरचा देखील या काळाबाजार प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी डॉक्टरलाही गजाआड केले आहे.

    डॉ. सचिन रघुनाथ पांचाळ असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. पांचाळ हा बीएएमएस असून ओनेक्स व क्रिस्टल ही दोन रूग्णालये तो चालवितो. तसेच गोदावरी मेडिकलही त्याचे आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वाकड पोलीसांनी यापूर्वी शशिकांत रघुनाथ पांचाळ (वय ३४, रा. थेरगाव), कृष्णा रामराव पाटील (वय २२, रा. थेरगाव), निखील केशव नेहरकर (वय १९, रा. चिंचवड) या तिघांना अटक केली आहे.

    आरोपींपैकी शशिकांत हा डॉ. सचिनचा भाऊ असून त्याचेही आयुश्री नावाने मेडीकल आहे. चिंचवड येथील ओनेक्स आणि क्रिस्टल या दोन्ही रूग्णालयांच्या नावाने आयुश्री आणि गोदावरी मेडीकल स्टोअर्स मार्पâत प्राप्त झालेले रेमडेसिवीर इंजेक्शन डॉ. सचिनचा भाऊ शशिकांत याच्या मध्यस्थीने तसेच कृष्णा पाटील व निखील नेहरकर याच्या मार्पâत काळया बाजारात विकली जात होती. डॉ. सचिन पांचाळ यांचा यव् गुन्ह्यात महत्वाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.