हॉटेलमध्ये जाण्याच्या बहाण्यानेनवीन कात्रज बोगद्याकडे नेऊन प्रियसीचा चाकू भोकसून केला खून

दोघेही कात्रज बोगद्याकडे निघाले होते. यावेळी नवीन कात्रज बोगद्याजवळ आल्यानंतर त्याने कारमध्येच तिच्या पोटात चाकू भोकसून तिचा खून केला.

    पुणे: प्रियकराने दारूच्या नशेत मध्यरात्री प्रियसीला हॉटेल नेण्याच्या बहाण्याने कात्रज बोगद्याजवळ (New Katraj tunnel) नेत कारमध्येच चाकू भोकसून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी प्रियकराला अटक केली आहे. सपना दिलीप पाटील (वय ३२, रा. धनकवडी) असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे. आरोपी राम गिरी याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना व राम यांच्यात गेल्या ९ ते १० वर्षांपासून प्रेम संबंध होते. दोघेही मूळचे परभणी जिल्ह्यातील आहेत. सपना एका मॉलमध्ये काम करत होती. तर, राम हा देखील एका कंपनीत काम करत होता. दरम्यान, राम व त्यांच्यात वाद होत असत. रविवारी राम हा मद्यपानकरून तिच्याकडे आला होता. त्याने तिला हॉटेलात जाऊ असे म्हणून रात्री कारमधून नेले.

    दोघेही कात्रज बोगद्याकडे निघाले होते. यावेळी नवीन कात्रज बोगद्याजवळ आल्यानंतर त्याने कारमध्येच तिच्या पोटात चाकू भोकसून तिचा खून केला. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. राम याला ताब्यात घेतले असल्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.