कोरोनाच्या वादळाने इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदील

इंदापूर : मागील वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने इंदापूर तालुक्यात पडलेला कोरडा दुष्काळ, त्यानंतर पावसाळ्यातील अतिवृष्टीचे आसमानी संकट व दूषित हवामानाचा पिकांवर झालेला प्रादुर्भावामुळे शेतकरी पुरता भरडलाला असतानाच कोरोना व्हायरस महामारीच्या वादळाने शेतकर्‍यांच्या शेतातील काढणीस आलेली केळी, द्राक्ष,डाळींब, कलिंगड, खरबुज यासारख्या नगदी पिकांना बाजार समीत्या व खरेदीदार बंद झाल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसला असुन इंदापूर तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदील झाला आहे.

 शासनाकडुन नुकसान भरपाई मिळावे, शेतकर्‍यांची मागणी

इंदापूर : मागील वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने इंदापूर तालुक्यात पडलेला कोरडा दुष्काळ, त्यानंतर पावसाळ्यातील अतिवृष्टीचे आसमानी संकट व दूषित हवामानाचा पिकांवर झालेला प्रादुर्भावामुळे शेतकरी पुरता भरडलाला असतानाच कोरोना व्हायरस महामारीच्या वादळाने शेतकर्‍यांच्या शेतातील काढणीस आलेली केळी, द्राक्ष,डाळींब, कलिंगड, खरबुज यासारख्या नगदी पिकांना बाजार समीत्या व खरेदीदार बंद झाल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसला असुन इंदापूर तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. तर शेतकर्‍यांच्या शेतपिकांचे नुकसानीबाबत शासन स्तरावरून कोणताही योग्य निर्णय होत नसल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी पुरता हवालदील झाल्याचे चित्र आहे.

– सर्व बाजारपेठा व आर्थीक व्यवहार बंद

 कोरोना महामारीने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे. त्याबाबत योग्य औषधोपचार उपाययोजना कोणत्याही देशाकडे अद्याप नसल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून देशात लाॅकडाउन घोषित केले आहे. त्यामुळे  देशात सर्वत्र संचारबंदी असुन सर्व बाजारपेठा व आर्थीक व्यवहार बंद करण्यात आलेले आहेत. संचारबंदी आदेश लागु असल्याने महत्वाच्या कामाशिवाय कोणीही बीनकामाचे रस्त्यावर फिरण्यास बंधन आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रत्येक गावातील ग्रामस्थानी गाव पातळीवर निर्णय घेवुन सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. दुसर्‍या गावातील व्यक्तीला आपल्या गावात प्रवेश करू द्यायचा नाही आणी आपणही दुसर्‍या गावात जायचे नाही.अशी स्थीती असल्याने शेतकर्‍याला इकडे आड आणी तीकडे विहीर अशी स्थीती निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडल्याचे पहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील गावोगावच्या सीमा लाॅक झाल्याने शेतकर्‍यांचा शेतमाल शेतातच पडून आहे. लाखो रूपये खर्च करून शेतकर्‍यांनी फळबागा जोपासल्या आहेत. शेतातील माल काढणीस तयार आहे परंतु बाजारपेठ नसल्याने शेतातील लाखो रूपयांचा शेतमाल शेतातच सडून चालल्याने शेतकर्‍यांवर मोठे कोरोना संकट ओढवले आहे.