कोरोना रूग्णांसाठी ३.३९ कोटींची औषधे खरेदी, १४ निविदाधारक अ‍ॅलोपॅथिक औषधांसाठी पात्र

कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी रूग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी आवश्यक असणारे औषधे आणि साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी अल्प मुदतीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या निविदा प्रक्रीयेत १६ निविदा धारकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये १४ निविदाधारक अ‍ॅलोपॅथिक औषधांसाठी पात्र झाले आहेत.

    पिंपरी :  पिंपरी-चिंचवड महापालिका रूग्णालयांमधील कोरोना बाधीत रूग्णांवरील उपचारासाठी विविध प्रकारची अ‍ॅलोपॅथिक औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. दहा पुरवठादारांकडून खरेदी करण्यात येणा-या ३८ प्रकारच्या औषधांसाठी तब्बल ३ कोटी २९ लाख रूपये खर्च होणार आहेत.

    कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी रूग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी आवश्यक असणारे औषधे आणि साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी अल्प मुदतीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या निविदा प्रक्रीयेत १६ निविदा धारकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये १४ निविदाधारक अ‍ॅलोपॅथिक औषधांसाठी पात्र झाले आहेत.

    दरपत्रकांची छाननी करून तुलनात्मक तक्ता अंतिम करण्याकरिता अ‍ॅलोपॅथिक औषधांकरिता १३ ऑक्टोबर २०२० रोजी लघुत्तम दर सादर केलेल्या पात्र निविदाधारकांना दर कमी करून देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. त्यापैकी दोन निविदा धारकांनी दर कमी करून दिला आहे. त्या अनुषंगाने या निविदेतील अ‍ॅलोपॅथिक औषधांच्या ५५ बाबींचा संगणकीय पद्धतीने तुलनात्मक तक्ता तयार करण्यात आला आहे.

    त्यातून एका बाबींचा दर प्राप्त झालेला नाही. तसेच सात बाबींकरिता एकच निविदा धारक अपात्र ठरलेले आहेत. तसेच ३ बाबींकरिता १० टक्क्यांपेक्षा जास्त दर अशा १७ बाबी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ३८ बाबींचे प्राप्त लघुत्तम दर स्वीकृत करण्यात आले आहेत. ३८ बाबींच्या या विविध प्रकारच्या औषधांसाठी ३ कोटी २९  लाख ८८ हजार रूपये खर्च होणार आहे.याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.