कोरोना प्रतिबंधक लस, रेमडेसिवीरचे उत्पादन ‘एचए’मध्ये करा – श्रीरंग बारणे

मागील काही संसर्गजन्य, साथीच्या आजारांचा विचार करता 'एचए'ने केंद्र सरकारला नेहमीच मदतीचा हात दिला आहे. आता केंद्र सरकारने लस निर्मिती, रेमडेसिवीरच्या उत्पादनाची एक संधी एच. ए.ला उपलब्ध करुन दिली. तर, याठिकाणी रेमडिसीवर आणि कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन होऊ शकेल. 'एच.ए'ची तेवढी क्षमता आहे. त्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचतील. त्याबरोबर लसीचे उत्पादन होईल आणि एचएला नवसंजीवनी मिळेल.

    पिंपरी: पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स कंपनी(एच. ए.) गेल्या अनेक दशकांपासून औषध निर्मिती क्षेत्रात मध्ये कार्यरत आहे. ‘एचए’मध्ये कोरोना प्रतिबंधक लस, रेमडेसिवीरचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. केंद्र सरकारने एक संधी दिली तर, ‘एचए’मध्ये कोरोना प्रतिबंधक लसी निर्मिती आणि रेमडिसिवीर इंजेक्शनचे उत्पादन होऊ शकेल.त्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचतील. लसीचे उत्पादन होईल आणि ‘एचए’ला पुन्हा नवसंजीवनी मिळेल. त्याकरिता ‘एचए’ला लस निर्मिती, रेमडेसिवीरच्या उत्पादनाची तत्काळ परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

    केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पत्र पाठवून खासदार बारणे यांनी या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. सदानंद गौडा यांच्याशी दुरध्वनीद्वारे सकारात्मक चर्चा झाली, असेही बारणे यांनी म्हटले आहे. श्रीरंग बारणे म्हणाले, केंद्र सरकारने देशातील पेनिसिलिन निर्मितीचा पहिला सार्वजनिक उपक्रम पिंपरी येथे सुरु केला. मध्यंतरी एच.ए वंâपनी आर्थिकदृष्ट्या डबघाईली आली असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून ४०० कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली. ‘एच. ए’ने कोरोना कालावधीत पीपीई किट, सॅनिटायझर इतर कोरोना विषयक उत्पादनांची निर्मित केली. त्यातून १०० कोटी रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे कोरोनावरील लस निर्मितीची ‘एच ए’ला परवानगी देणे गरजेचे आहे. कंपनीने तसा अर्जही केंद्र सरकारकडे केला आहे. दुसNया लाटेत २ कोटी ५८ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील २ लाख ७७ हजार लोकांचा मृत्यू झाला. देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे.

    सध्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट, हैद्राबादेतील भारत बायोटेक कंपनीमार्फत कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन सुरु आहे. केंद्र सरकार कोरोनाशी लढा देण्यासाठी सज्ज आहे. लसीचे उत्पादन वाढविण्यासाठीही प्रयत्नशील आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रेमडिसीवीरच्या तुटवड्याची समस्या भेडसावत आहे. रेमडिसीवीरची मागणी आणि पुरवठा यांत संतुलन साधण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक पाऊले उचलत आहे. दुसरी लाट तीव्र आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. पिंपरीतील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स कंपनी हा केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असून १९५५ – ५६ मध्ये कंपनीची स्थापना झाली. कंपनीत पेनिसिलिनसह विविध औषधांचे उत्पादन केले जाते. टोचण्यायोग्य लसी, गोळ्या, औषधे, पातळद्रव्य आदी औषध निर्माण शास्त्राप्रमाणे तयार केली जातात. मागील काही संसर्गजन्य, साथीच्या आजारांचा विचार करता ‘एचए’ने केंद्र सरकारला नेहमीच मदतीचा हात दिला आहे. आता केंद्र सरकारने लस निर्मिती, रेमडेसिवीरच्या उत्पादनाची एक संधी एच. ए.ला उपलब्ध करुन दिली. तर, याठिकाणी रेमडिसीवर आणि कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन होऊ शकेल. ‘एच.ए’ची तेवढी क्षमता आहे. त्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचतील. त्याबरोबर लसीचे उत्पादन होईल आणि एचएला नवसंजीवनी मिळेल. केंद्र सरकारचेही लस उत्पादनात मोठे पाऊल ठरेल. सरकाराला आर्थिक उत्पन्नही मिळेल. स्वस्त दरात औषध उपलब्ध होईल, असेही खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.