दारूबंदी तो बहाणा है.. म्हणत दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावरून सरकारला लक्ष करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना रुपाली चाकणकरांचा खोचक सवाल

सरकारने सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांतील लोक दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते.

    पुणे: चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. मात्र या विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी फडणवीसला चांगलेच सुनावले आहे. चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सभागृहातील भाषणाचा एक जुना व्हीडिओ शेअर केला असून यामध्ये देवेंद्र फडणवीस दारुबंदी उठवण्याचा निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देताना ऐकायला मिळत आहे.

    दारुबंदी हा तर केवळ एक बहाणा आहे. चंद्रपुरातील काही लोक अवैध दारुविक्रीच्या माध्यमातून मालपाणी मिळवतात. दारुबंदीचा निर्णय उठवल्यास ते मालपाणी बंद होईल, असा देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा आशय आहे. यावर चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीसांना ‘ दारूबंदी तो बहाणा है
    “मालपाणी” निशाना है…. नशा दौलत का ऐसा भी क्या, के तुझे कुछ भी याद नहीं क्या हुआ तेरा….

    ठाकरे सरकारने सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांतील लोक दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. मात्र, दारुबंदी असूनही चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती.