मालमत्ता कर बीले, सेवाआकार बीलांच्या छपाईसाठी २० लाखाचा खर्च

लघुत्तम निविदाधारक रहाटणीतील विशाल एंटरप्रायजेस आणि पिंपरीतील सिद्धी कॉपीअर अ‍ॅण्ड स्टुडंट कन्झुमर स्टोअर या दोन पुरवठादारांनी दर सादर केले. त्यांना सादर केलेला दर आणखी कमी करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार, त्यांनी एक रूपयांमध्ये ६२ प्रति नग आणि ४२ प्रति नग असा दर सादर केला.

    पिंपरी : महापालिका करआकारणी व करसंकलन विभागाने केलेल्या मागणीनुसार महापालिका हद्दीतील मालमत्ताधारकांसाठी आवश्यक मालमत्ताकर बीले आणि झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन विभागाने केलेल्या मागणीनुसार सेवाआकार बीले नोटीस, डाटासह आणि कोरी बीले छपाई करून पुरवठा करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छूक पुरवठादारांकडून निविदा मागविण्यात आल्या. २० लाख २७ हजार रूपये निविदा दर निश्चित करण्यात आला.

    त्यानुसार, लघुत्तम निविदाधारक रहाटणीतील विशाल एंटरप्रायजेस आणि पिंपरीतील सिद्धी कॉपीअर अ‍ॅण्ड स्टुडंट कन्झुमर स्टोअर या दोन पुरवठादारांनी दर सादर केले. त्यांना सादर केलेला दर आणखी कमी करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार, त्यांनी एक रूपयांमध्ये ६२ प्रति नग आणि ४२ प्रति नग असा दर सादर केला. हा दर स्विकृत करण्यात आला आहे. त्यानुसार, १२ लाख ७५ हजार रूपये बीले छपाई करण्यासाठी २० लाख ३५ हजार रूपये इतका खर्च होणार आहे. अंदाजपत्रकीय दर २० लाख २७ हजार रूपयांपेक्षा हा दर ०.४० टक्क्यांनी अधिक आहे. त्यानुसार, दोन पुरवठादारांना बीले छपाईचे आदेश देण्यात आले आहेत.