अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी उध्वस्त ; साडेबारा लाखांंचा मुद्देमाल जप्त

आठ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

भिगवण : भिगवण परिसरात बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी जिलेटीनच्या सहाय्याने उध्वस्त करुन साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचप्रमाणे बोट मालकांच्यासह बोटीवर काम करणाऱ्या परप्रांतीय युवकांवर गुन्हा दाखल केला. यामधील आठजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबतची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली. शौकत कमरुद्दीन शेख (वय ३२ वर्षे रा.मनसिंहा थाना राजमहल, जि. साहबगंज, बाहुद्दीन मुजामिल शेख (वय २० वर्षे रा. बेगमगंज थाना नादानगर जि साहबगंज) रफिक दानेश शेख वय ३२ वर्षे रा.बेगमगंज थाना नादानगर, हन्नन बजरुद्दीन शेख (वय ३४ वर्षे रा.तिनहारिया कलबन्ना थाना नादानगर ), मनीरुल कमरुद्दीन शेख (वय ३५ रा.मनसिंहा थाना राजमहल, रोहित मज्जामिल शेख (वय २७ रा.दरगाडांगा थाना नादानगर ), मुबारक मिरज शेख (वय २६ वर्षे रा. पहाडगाव थाना नादानगर हे सात जण झारखंड राज्यातील व साहबगंज जिल्ह्यातील असून इतर तिघे महाराष्ट्र राज्यातील आहेत त्यामध्ये आकाश सुरेश सावंत (वय १९ रा. बाभळगांव धुमाला ता.कर्जत जि.अहमदनगर), सोन्या बाळासाहेब सरक (वय २५ वर्षे, कात्रज ता.करमाळा जि सोलापूर ) ( बोटमालक), ज्ञानेश्वर शिवाजी साळुंके (बोटमालक) रा.विरवाडी मदनवाडी (ता. इंदापूर) जि पुणे यांच्यावर पोलीस नाईक इनक्लाब पठाण यांच्या फिर्यादीवरुन पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -कोरोनामुळे महसूल प्रशासननाचे दुर्लक्ष
तक्रारवाडी(ता. इंदापूर) येथील उजनी जलाशयाच्या पात्रामध्ये बुधवारी रात्री पावणे अकराच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली भिगवण, तक्रारवाडी, कुंभारगाव याठिकाणी अनेक दिवसांपासून बेकायदेशीररित्या वाळू उपसा चालू होता त्याचप्रमाणे कोरोनाच्या साथीमुळे महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले होते मात्र भिगवण पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक जीवन माने यांना अवैधरित्या वाळूउपसा चालला असल्याचे समजल्यावर त्यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांना माहिती दिली त्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने तक्रारवाडी येथे चालू असलेल्या १२ लाख रुपये किमतीच्या चार बोटींवर कारवाई केली तसेच ४० हजार रुपयांची ८ ब्रास वाळू असा १२ लाख ४० हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला यामध्ये जिलेटीनच्या साह्याने बोटी उध्वस्त केल्या.

सदरची कारवाई ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक जीवन माने यांच्यासह महसूलचे महादेव भारती, शिवाजी खोसे यांच्या पथकाने केली.

-सरसकट कारवाई होणे गरजेचे
कारवाईची चाहूल लागताच अनेक वाळूमाफियांनी आपल्या बोटी इतरत्र हलवल्या त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्या व नदीपात्रामध्ये मोठ्या संख्येने दिसणाऱ्या बोटी या बंडगरवाडीच्या ओढ्याच्या काठालगत गुरुवारी पाहावयास मिळाल्या त्यामुळे अशी कारवाई करताना सरसकट कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

-लुटूपुटूची कारवाई
भिगवण परिसरातील उजनी जलाशयाच्या भागांमध्ये अवैद्य वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये शासनाचा कोट्यवधी रुपये बुडवून राजरोसपणे वाळू उपसा केला जातो. अनेक वेळा कारवाई करून देखील वाळूमाफियांना याचा काही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. कारवाई केली की लगेच चार दिवसांमध्ये बोटी दुरुस्त करायचा आणि पुन्हा नेहमीप्रमाणे वाळू उपसा करण्याचा धंदा चालू करायचा अशी परिस्थिती या भागात पहावयास मिळत आहे. त्यामुळे आत्ताच झालं आजची झालेली कारवाई ही केवळ लुटूपुटूची कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

“वाळूमाफियांच्या विरोधातील मोहीम तीव्र करणार असून यापुढे अवैधरीत्या वाळू उपसा करणाराची गय  केली जाणार नाही.”
-जीवन माने, सहाय्यक पोलीस निरिक्षक भिगवण