संपादक व लेखक गिरीश कुबेर यांच्या फोटोला चपलांचा हार घालून निषेध ; भीम आर्मी एकता मिशनचे लोकसत्ताच्या पुणे कार्यालयासमोर निदर्शन

या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जो वारसाहक्काचा प्रश्न निर्माण झाला तो सोडवण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात केला. महाराणी सोयराबाई ठार मारले. छत्रपती संभाजी महाराज धाडशी असले तरी आणि मुत्सद्दीपणाची कमतरता होती. याशिवाय बाजीराव पेशवे यांची तुलना छत्रपती महाराजांचा सोबत केली आहे. अशा इतिहासाचा कुठलाही संदर्भ नसताना लिखाण करून जाणीवपूर्वक समाज प्रदूषित करण्याचे काम करीत आहे.

    पुणे: रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या गिरीश कुबेर लिखित वादग्रस्त पुस्तकावरून, संपादक गिरीश कुबेर यांच्या फोटोला चपलांचा हार घालून भीम आर्मी एकता मिशनच्या कार्यकर्त्यांनी लोकसत्ताच्या पुणे येथील कार्यालयासमोर निदर्शने केली. या पुस्तकामध्ये इतिहासाचे विकृत लिखाण करून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे व त्यांच्या बद्दल आक्षेपार्य लिखाण केले असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

    या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जो वारसाहक्काचा प्रश्न निर्माण झाला तो सोडवण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात केला. महाराणी सोयराबाई ठार मारले. छत्रपती संभाजी महाराज धाडशी असले तरी आणि मुत्सद्दीपणाची कमतरता होती. याशिवाय बाजीराव पेशवे यांची तुलना छत्रपती महाराजांचा सोबत केली आहे. अशा इतिहासाचा कुठलाही संदर्भ नसताना लिखाण करून जाणीवपूर्वक समाज प्रदूषित करण्याचे काम करीत आहे.

    गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करावा राज्य सरकारने या पुस्तकावर कायमस्वरूपी बंदी आणावी या मागणीसाठी भीम आर्मीच्या वतीने त्यांच्या पुणे येथील कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आले यावेळी भीम आर्मी ऐकता मिशन चे दत्ता पोळ,नीता अडसुळे ,मुकेश गायकवाड, प्रदीप कांबळे गौतम पोटे,अक्षता परदेशी, संध्या वाघमारे, रेहना शेख ,जयवंत पोळ,अलोखं भिंगारदिवे,भारत शिंदे उपस्थित होते.