काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

कर्जत : काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा कर्जतमध्ये वडार समाजाच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे तसेच ओढ कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने आज  तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी गोविंद तांदळे, याच्या नेतृत्वाखाली अमोल तांदळे नितीन जाधव जानू विटकर गणेश गुंजाळ चंद्रकांत तांदळे श्रीकांत तांदळे सतीश तांदळे संजय लष्कर नितीन अलकुंटे हे उपस्थित होते

या दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की, बंगल्यावर येथील काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्यावर चार ऑगस्ट रोजी सोशल मीडियावरील पोस्टचे निमित्त करून काही समाजकंटकांनी जीवित हानी करण्याच्या उद्देशाने हल्ला करून त्यांची वाहन व घर पेटवून दिले या घटनेचा महाराष्ट्रातील वडार समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे आम्ही या बाया हल्ल्याचा धिक्कार करतो आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील संपूर्ण वडार समाज उभा आहे सरकारने त्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा या निवेदनामध्ये देण्यात आला आहे.