लोणीकंद येथे चीनच्या राष्ट्राध्यक्षाच्या प्रतिमेचे दहन करून निषेध

वाघोली : (ता. हवेली) आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमा अंतर्गत लोणीकंदचे माजी उपसरपंच रवींद्र कंद यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून लोणीकंद येथील तरुणांनी आत्मनिर्भर भारताचा बिगुल वाजवत

वाघोली : (ता. हवेली) आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमा अंतर्गत लोणीकंदचे माजी उपसरपंच रवींद्र कंद यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून लोणीकंद येथील तरुणांनी आत्मनिर्भर भारताचा बिगुल वाजवत चीनच्या साम्राज्यवादी धोरणाचा जाहीर निषेध करून चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिनपिंगच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.  

शासकीय नियमांचे पालन करून सोमवार (दि.२२) रोजी गावतील मुख्य रस्त्यावरून स्वदेशी फेरी काढण्यात आली. यावेळी तरुणांनी भारतमातेचा जयजयकार करत लोणीकंद परिसर दणाणून टाकला होता. चेतन शिंदे, समीर झुरूंगे, योगीराज शिंदे, गौरव झुरूंगे विशाल कंद, चेतन शिंदे, बबलू यादव, सुमित मगर, अक्षय जमादार, गणेश कंद, राहुल शिंदे, किरण कंद, हेमंत कंद, स्वप्नील कंद, सौरभ वाळुंज, सुयोग्य कंद आदि तरुण फेरीमध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन लोणीकंद येथील तरुणांनी केले होते. कार्यक्रमाची प्रस्तवना संकेत झुरूंगे यांनी केली तर आभार प्रदर्शन शुभम जोशी यांनी केले.