अभिमानास्पद! पुण्याच्या अनिकेतने घेतली लेफ्टनंट पदापर्यंत झेप ; वडिलांचं अचानक झालेल्या निधनानंतरही खचून न जाता गाठले ध्येय

पुणे : पुणेकरांसाठी एक अभिमानास्पद घटना घडली आहे. पुण्यातील तरुण अनिकेत अमरेंद्र साठे यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे १२ डिसेंबरला पार पडलेल्या दीक्षांत संचलनानंतर त्यांची नियुक्ती झाली. 'एनडीए'मध्ये दाखल होण्यापूर्वी अनिकेत यांचे वडील अमरेंद्र साठे यांचं अचानक निधन झालं. हा धक्का अनिकेत आणि कुटुंबीयांसाठी खूपच मोठा होता

पुणे : पुणेकरांसाठी एक अभिमानास्पद घटना घडली आहे. पुण्यातील तरुण अनिकेत अमरेंद्र साठे यांची भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे १२ डिसेंबरला पार पडलेल्या दीक्षांत संचलनानंतर त्यांची नियुक्ती झाली. ‘एनडीए’मध्ये दाखल होण्यापूर्वी अनिकेत यांचे वडील अमरेंद्र साठे यांचं अचानक निधन झालं. हा धक्का अनिकेत आणि कुटुंबीयांसाठी खूपच मोठा होता. पण अनिकेत खचला नाही. त्यानं त्याच्या आयुष्यात आलेल्या या परिस्थितीवर मात करीत लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या या उत्तुंग यशानं एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

अनिकेत साठे हे कोथरुडचे रहिवासी असून त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण विखे पाटील मेमोरियल स्कूल येथे पूर्ण केलं. तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यानंतर २०१६ मध्ये अनिकेत साठे यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( NDA) च्या १३७व्या तुकडीसाठी निवड झाली होती.’राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी’त तीन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून मध्ये एक वर्षाचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. चार वर्ष खडतर मेहनत केल्यानंतर आज त्याची लेफ्टनंट पदी निवड झाली.