उद्यानांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा पुरविणार; एक कोटीचा खर्च

महापालिकेच्या उद्यानांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी ६० लाख ८८ हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, इच्छूक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. या कामांसाठी केवळ दोन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या.

    पिंपरी: महापालिकेच्या हद्दीतील उद्यानांमध्ये दिव्यांग (अपंग) व्यक्तींसाठी विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या कामांसाठी दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या असून त्यासाठी एक कोटी खर्च होणार आहे.

    पालिका क, ड, फ, ह आणि अ, ब, ड आणि ग ह क्षेत्रीय हद्दीतील महापालिकेच्या उद्यानांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी ६० लाख ८८ हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, इच्छूक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. या कामांसाठी केवळ दोन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये तन्मय एंटरप्रायजेस या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा १६.२९ टक्के कमी दर सादर केला. त्यामुळे प्राप्त निविदा मंजूर दराने म्हणजेच ५० लाख ८२ हजार रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस १ लाख १५ हजार आणि मटेरियल टेस्टींग चार्जेस १६ हजार रूपये असा एवूâण ५२ लाख १४ हजार रूपये खर्च होणार आहे.

    अ, ब, ड आणि ग क्षेत्रीय हद्दीतील उद्यानांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी ६० लाख ९६ हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार, इच्छूक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. या कामांसाठी पाच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये एस. बी. काळे या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा २३.१० टक्के कमी दर सादर केला. त्यामुळे प्राप्त निविदा मंजूर दराने म्हणजेच ४६ लाख ७५ हजार रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस १ लाख १५ हजार आणि मटेरियल टेस्टींग चार्जेस १६ हजार रूपये असा एवूâण ४८ लाख ७ हजार रूपये खर्च होणार आहे. या दोन्ही कामांसाठी मिळून १ कोटी २१ हजार रूपये खर्च होणार आहे.