मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील पारगांव येथील आरोग्य उपकेंद्राच्या वतीने पावसाळ्यात होणारे विविध आजार व त्याविषयी घेण्याची काळजी याबाबत जनजागृती करण्यात आली. कोरोना विषाणू संसर्ग होम

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील पारगांव येथील आरोग्य उपकेंद्राच्या वतीने पावसाळ्यात होणारे विविध आजार व त्याविषयी घेण्याची काळजी याबाबत जनजागृती करण्यात आली. कोरोना विषाणू संसर्ग होम कोरंन्टाईन व नविन बाहेर गावातून आलेल्या नागरिकांना ताबडतोब होम कोरंन्टाईन होण्यासाठी माहिती देण्यात आली. पावसाळा सुरु झाला असुन हिवताप, डेंग्यु,चिकनगुणिया याविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. डेंग्यु, चिकनगुणिया, मलेरिया हे आजार टाळण्यासाठी सात दिवसातून एकदा कोरडा दिवस पाळण्यात यावा. हिवताप,डेंग्यु चिकनगुणिया हे आजार होऊ नये. यासाठी गप्पी मासे पाळा.तसेच गावात घाणीचे साम्राज्य होणार नाही.यासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. बॅक,शाळा,ग्रामपंचायत बिल्डींग स्लॅबवरती पावसाळ्यात पाणी साचणार नाही. याची काळजी घ्यावी. पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी. डासांची पैदास होऊ नये.यासाठी रस्त्यावर डबकी साचून देऊ नये. औषधांची फवारणी करावी,असे आवाहन आरोग्य सहाय्यक अनिल तोडकरी यांनी दिली.