Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation

शुक्रवारी दिवसभरात संपूर्ण पाकिस्तानात ३४९५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, एकट्या पुण्यात शनिवारी ४९७३ रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानची एकूण लोकसंख्या २२ कोटींच्या आसपास आहे. यापैकी पाकिस्तानात शुक्रवारी फक्त ३४९५ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर, पुण्याची लोकसंख्या फक्त १ कोटी असूनही येथे कोरोनाचे तब्बल ४९७३ नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे.

    पुणे : देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वाढला आहे. वाढती रुग्णसंख्या धोक्याची घंटा ठरत आहे. अशातच धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एकट्या पुण्यात संपूर्ण पाकिस्तानपेक्षाही जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, मुंबईमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र हा आशिया खंडातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरला आहे.

    शुक्रवारी दिवसभरात संपूर्ण पाकिस्तानात ३४९५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, एकट्या पुण्यात शनिवारी ४९७३ रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानची एकूण लोकसंख्या २२ कोटींच्या आसपास आहे. यापैकी पाकिस्तानात शुक्रवारी फक्त ३४९५ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर, पुण्याची लोकसंख्या फक्त १ कोटी असूनही येथे कोरोनाचे तब्बल ४९७३ नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे.

    दरम्यान, शुक्रवारी एकट्या मुंबईत २८७७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. दरम्यान, जपान, बांगलादेश, सौदी अरेबिया या देशांशी तुलना करता भारतातील महाराष्ट्र हे राज्य कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

    पुणे, मुंबई, नागपुर. औरंगाबाद येथील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचा उद्रेक झाला असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले असून अनेक नाईट कर्फ्यु तसेच कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत.