पुणे: गायकवाड पिता पुत्रावर आणखी एक गुन्हा; कर्जाप्रकरणी दिली जीवे मारण्याची धमकी

सांगवी पोलिस ठाण्यात नानासाहेब शंकर गायकवाड, गणेश गायकवाड (मुलगा), राजाभाऊ अंकुश (चालक) यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विठ्ठल गुरव यांनी गायकवाड याच्याकडून कर्ज घेतले होते. ते परत करण्यासाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले होते.

    पुणे : उद्योजक नानासाहेब गायकवाड याच्यासह मुलावर आणखी एक गुन्हा दाखल झाला असून कर्जाप्रकरणी जीवे मारण्याची धमकी दिल्याच समोर आले आहे. दरम्यान, दोन्ही पिता पुत्रावर पोलिसांनी मकोकाअंतर्गत कारवाई करताच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अशा प्रकारचे अनेक प्रकरण समोर येत आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आणखी काही प्रकरण समोर येऊ शकतात.

    या घटने प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात नानासाहेब शंकर गायकवाड, गणेश गायकवाड (मुलगा), राजाभाऊ अंकुश (चालक) यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विठ्ठल गुरव यांनी गायकवाड याच्याकडून कर्ज घेतले होते. ते परत करण्यासाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले होते.

    मात्र, तक्रारदार हे वेळेत कर्ज परत करू शकले नाहीत. तसेच व्याज ही वेळेत भरत नव्हते. त्यानंतर, गायकवाड याचा चालक अंकुश याने तक्रारदार यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]