delta coronavirus

साेमवारपासून शहरातील निर्बंध शिथिल केले गेले आहे. साेमवारी रुग्णसंख्या कमी झाली हाेती, परंतु मंगळवारी पुन्हा रुग्णसंख्या दाेनशेच्या पुढे आढळून आली आहे. गेल्या चाेवीस तासांत सुमारे ४ हजार ७४८ चाचण्या केल्या गेल्या. यामध्ये २४६ रुग्ण काेराेनाबाधित आढळून आले. तर ३५१ रुग्ण हे काेराेनामुक्त झाले आहे. सध्या शहरात २ हजार ७७३ सक्रीय रुग्ण असून, त्यापैकी ४८३ रुग्णांची प्रकृती गंभीर असुन, ७३६ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.

    पुणे : शहरात गेल्या चाेवीस तासांत काेराेनाचे नवीन २४६ रुग्ण आढळून आले आहेत. तर शहरातील दहा जणांसह एकुण २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

    साेमवारपासून शहरातील निर्बंध शिथिल केले गेले आहे. साेमवारी रुग्णसंख्या कमी झाली हाेती, परंतु मंगळवारी पुन्हा रुग्णसंख्या दाेनशेच्या पुढे आढळून आली आहे. गेल्या चाेवीस तासांत सुमारे ४ हजार ७४८ चाचण्या केल्या गेल्या. यामध्ये २४६ रुग्ण काेराेनाबाधित आढळून आले. तर ३५१ रुग्ण हे काेराेनामुक्त झाले आहे. सध्या शहरात २ हजार ७७३ सक्रीय रुग्ण असून, त्यापैकी ४८३ रुग्णांची प्रकृती गंभीर असुन, ७३६ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. आजपर्यंत एकुण ४ लाख ७४ हजार ५४५ जणांना काेराेनाची लागण झाली हाेती, त्यापैकी ४ लाख ६३ हजार २८० जणांनी काेराेनावर मात केली आहे. तर ८ हजार ४९२ जणांचा बळी गेला आहे.