पुण्यात आज ४२ कोरोना रुग्णांची नोंद

पुणे : शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी ४२ नवीन रुग्ण आढळून आले. ही संख्या ५८६ पर्यंत पोचली आहे.तर रविवारी अठरा जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. तसेच एकही रुग्णचा बळी न

 पुणे : शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी ४२ नवीन रुग्ण आढळून आले. ही संख्या ५८६ पर्यंत पोचली आहे.तर रविवारी अठरा जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. तसेच एकही रुग्णचा बळी न गेल्याने दिलासा निर्माण झाला आहे. शहरात आजपर्यंत कोरोना बाधित पन्नास जणांचा बळी गेला आहे. कोरोना वर मात करणार्यांच्या संख्येत रविवारी १८ ने भर पडली आहे. यात महापालिकेच्या नायडू रुग्णालयात उपचार झालेल्या १५ जणांचा समावेश आहे. के.ई.एम रुग्णालयातील दोन आणि ससुन रुग्णालयातील एक रुग्ण उपचार घेऊन कोरोना मुक्त झाले. नायडू रुग्णालयातुन आजपर्यंत ४७ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सह्याद्री रुग्णालय, भारती रुग्णालय, जहांगीर रुग्णालय, डीएमएच या रुग्णालयातुन आजपर्यंत प्रत्येकी एक रुग्ण उपचारांनी ठिक झाले आहे. शहरात कोरोनाची बाधा वाढत असताना एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने दिलासा निर्माण झाला आहे.

रुग्ण बरे होऊन घरी जात असले तरी कोरोना मुळे निर्माण झालेली चिंता अद्याप मिटली नाही. रविवारी शहरात आणखी ४२ कोरोना बाधित आढळून आले आहेत. एकुण कोरोना बाधितांची संख्या ५८६ इतकी झाली असुन, नायडू आणि इतर रुग्णालयात ३९६ आणि ससुन रूग्णालयात १३३ जणांवर उपचार सुरू आहेत. 
पंधरा जणांची प्रक्रुती चिंताजनक आहे. आजपर्यंत ३७८७ जणांचे घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी ३२०७ जणांचे तपासणी अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. फ्ल्यु सारखी लक्षणे दिसल्यानंतर नागरिकांनी महापालिकेच्या फ्ल्यु क्लिनिक मध्ये जाऊन उपचार करुन घ्यावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे