पुण्यात गेल्या चोवीस तासांत १८९ कोरोना बाधित: २७९ रुग्णांना डिस्चार्ज

आतापर्यंत ४ लाख ८२ हजार २३ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी ४ लाख ७० हजार ३७६ जण बरे झाले आहेत. तर ८ हजार ६५६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत ४ हजार ८०२ संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

    पुणे :  शहरात चोवीस तासांत १८९ कोरोना बाधित आढळले असून बरे झालेल्या २७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान पुण्यातील ४ रुग्णांसह ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात २ हजार ९९१ ऍक्टीव्ह कोरोना बाधित असून त्यापैकी २२५ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

    शहरात आतापर्यंत ४ लाख ८२ हजार २३ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी ४ लाख ७० हजार ३७६ जण बरे झाले आहेत. तर ८ हजार ६५६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत ४ हजार ८०२ संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.