फुलगावमध्ये पुणे जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेटचा रंगणार महासंग्राम

स्पर्धेत शिरूर-हवेलीसह जिल्ह्यातील उत्कृष्ठ संघांचा समावेश:टेनिस क्रिकेटचे खेळाडू घडणार

वाघोली:हवेली तालुक्यातील फुलगाव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस क्रिकेट मैदानावर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली व लोणीकंदचे प्रसिद्ध उद्योजक क्रिकेटप्रेमी हनुमंत कंद यांच्या वाढदिवसानिमित्त एच.के.स्पोर्ट क्लब हवेली यांच्या वतीने आयोजित १९ ते २३ जानेवारी दरम्यान पुणे जिल्हास्तरीय फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम रंगणार असल्याची माहिती मुख्य आयोजक प्रसिद्ध स्टार टेनिस क्रिकेट खेळाडू अमित तापकीर,ओमकार कंद,प्रमोद कंद,शुभम तळेकर,पृथ्वीराज कंद,ओमकार झुरुंगे यांनी दिली.

फुलगाव(ता.हवेली) टेनिस बॉल क्रिकेट मैदानाच्या कामाची पाहणी करताना हनुमंत कंद सह आयोजक

या टेनिस बॉल फुलपिच क्रिकेट स्पर्धेत शिरूर-हवेली तालुक्यांसह पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ठ पद्धतीच्या संघांनी प्रतिसाद देऊन सहभाग नोंदविला आहे.यामध्ये आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे.यामध्ये प्रथम क्रमांकास फुलगावचे प्रसिद्ध उद्योजक पै.किरण साकोरे,गुरुदत्त डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर निळोबा कंद यांच्याकडून १,११,१११,दुतीय क्रमांकास लोणीकंदच्या उपसरपंच शितल ज्ञानेश्वर कंद व कल्पतरू डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर निखिल कंद यांच्याकडून ७१,१११/-,तृतीय क्रमांकास फुलगावचे माजी सरपंच सुनील वागस्कर व शैनेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष अर्जुन वागस्कर यांच्याकडून ४१,१११/-,तर चतुर्थ क्रमांकास श्रावणी हॉटेलचे प्रोप्रायटर अजय यादव यांच्याकडून २१,१११/- रुपये अशी मोठी पारितोषिक ठेवण्यात आलेली आहे.तसेच स्पर्धेत उत्कृष्ठ खेळ करणाऱ्या खेळाडूंना अनेक वयक्तिक बक्षिसेही ठेवण्यात आलेली आहे.
या स्पर्धेमध्ये अंतरराष्ट्रीय प्रमाणे नियमांची अंमलबजावणी करण्यात आलेली असून स्पर्धेचे लाईव्ह प्रेक्षपण यु.ट्यूब द्वारे करण्यात आले आहे.तर कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून ही स्पर्धा आयोजकांच्या वतीने खेळवली जाणार आहे.बऱ्याच कालावधीनंतर ही स्पर्धा हवेली तालुक्यामध्ये होत असल्याने मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला जिल्हाभरातून प्रतिसाद मिळत आहे.यातून जिल्हाभरातून टेनिस बॉल क्रिकेटचे उत्कृष्ठ पद्धतीचे स्टार खेळाडू घडणार आहेत.या स्पर्धेचे आयोजन व नियोजनासाठी अमित तापकीर,ओमकार कंद,प्रमोद कंद,शुभम तळेकर,पृथ्वीराज कंद,ओमकार झुरुंगे हे आयोजक परिश्रम घेत आहेत.उत्कृष्ठ पद्धतीचे नियोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार जिल्हाभरातील क्रिकेट खेळाडू व ग्रामस्थांनी मानले.

ही क्रिकेट स्पर्धा आम्ही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिपदादा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली भरवलेली असून यामध्ये जिल्हाभरातील ग्रामीण भागातील खेळाडूंना आपला खेळाचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे.तर यातून पुणे जिल्हाभरातून टेनिस क्रिकेटचे उत्कृष्ठ पद्धतीचे स्टार खेळाडू घडणार आहेत.त्यामुळे स्पर्धा जिल्हाभरातील टेनिस खेळाडूंसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.यासाठी आमच्या एच.के.स्पोर्ट क्लबच्या खेळाडूंनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे.

-हनुमंत कंद,प्रसिद्ध उद्योजक तथा क्रिकेट प्रेमी,लोणीकंद